Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’साधूसंत येती घरा तोची दिवाळी दसरा ः भागवत मुठे पाटील

श्रीरामपूर ः सुखदेव सुकळे यांनी संपादित केलेला ’उसगावचा संतमहिमा’परिसंवाद आणि भाऊबीज स्नेहभेटीमुळे  माणुसकीची  श्रीमंती वाढते,             पूर्वी

जत्रा हॉटेलवर झालेल्या हल्ल्याचा निघोजमध्ये निषेध
डॉ. आंबेडकर जयंती मिरवणुकीतील दगडफेक पूर्वनियोजित ?
सीसीटीव्ही यंत्रणेसाठी दहा कोटीं रुपयांचा निधी मंजूर

श्रीरामपूर ः सुखदेव सुकळे यांनी संपादित केलेला ’उसगावचा संतमहिमा’परिसंवाद आणि भाऊबीज स्नेहभेटीमुळे  माणुसकीची  श्रीमंती वाढते,             पूर्वीपासून ’साधूसंत येती घरा, तोची दिवाळी दसरा ’हीच आपली संस्कृती असून हाच अनुभव विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानने फराळ आणि साहित्य शब्दसंवादाने दिला असल्याचे गौरव उदगार खासदार गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेचे माजी मुख्याध्यापक भागवत मुठे पाटील यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील बोरावके नगरमधील विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे’उसगावचा संतमहिमा ’पुस्तक परिसंवाद आणि भाऊबीज महत्व विषयावर वाड्.मयीन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी मुख्याध्यापक मुठे पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य टी. ई. शेळके होते.स्व..पुष्पाताई सुकळे यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले आणि सुखदेव सुकळे यांनी स्वागत, प्रास्ताविक करून उपस्थितांना सन्मानित केले. सुकळे यांनी  संपादित केलेल्या ’उसगावचा संतमहिमा ’पुस्तकावर अनेकांनी आपले विचार व्यक्त केले. माजी प्राचार्य किसनराव वमने यांनी आपल्या जीवनातल्या घटना सांगून अड,.रावसाहेब शिंदे यांनी जे संस्कार आणि लोकसेवेचे बळ दिले, ते संतवृत्तीचेच होते,त्यांच्यामुळे माळेवाडी गावात जलसंधारण कामे करू शकलो ही भावना व्यक्त केली.प्राचार्य शेळके म्हणाले, सुखदेव सुकळे हे 1965मध्ये श्रीरामपुरात आले. 2005पर्यंत त्यांनी प्रामाणिकपणे रयत शिक्षण संस्थेत प्रशासकीय काम केले.रावसाहेब शिंदे यांच्या शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक कार्यात त्यांचा सिहांचा वाटा आहे.सुकळे, बुरकुले परिवाराला रावसाहेब शिंदे यांच्यामुळे जसे स्थैर्य आले, त्याचप्रमाणे रावसाहेब शिंदे यांच्यामुळेच मी श्रीरामपूरला स्थायिक झालो.आम्ही श्रीरामपूर  या आधुनिक शहराशी एकरूप झालो आहोत, या शहरात अनेक परिवार विविध भागातून आले आणि श्रीरामपूर झाले. जिथे प्रेम मिळते तेथे माणूस स्थिर होतो, श्रीरामपूरकर हे माणुसकीचे शहर आहे, आता या शहरात जिल्ह्याच्या दृष्टीने अनेक सोई आहेत, गुणवत्ता आहे, प्रत्येकाला आता श्रीरामपूर जिल्हा व्हावा हे मनापासून वाटते, असे विचार व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. सुरेखा बुरकुले, संजय बुरकुले, संकेत बुरकुले,पत्रकार बाबासाहेब चेडे, सुयोग बुरकुले यांनी नियोजनात भाग घेतला. सूत्रसंचालन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले तर सुरेखा बुरकुले यांनी आभार मानले.

साहित्यचर्चेचा फराळ भरणपोषण करील ः डॉ. बाबुराव उपाध्ये – भाऊबीज ही भावाबहिणीच्या स्नेहभेटीची आपली संस्कृती असल्याचे सांगून डॉ. बाबुराव उपाध्ये म्हणाले, दिवाळी ह्या पवित्र आणि माणुसकीची संस्कृती जोपासणार्‍या सणाचा शेवटचा गोड दिवस म्हणजे भाऊबीज होय. चारित्र्य आणि चरित्र, कुटुंबनीती आणि स्नेहाचे दृढबंध, माणसाला लोकशाही मूल्ये शिकविणारा आणि संतवृत्ती जोपासणारा दिवस म्हणजे पाच दिवस चालणारा दिवाळी सण आहे, तो साहित्य चर्चेने संपन्न झाला, हा शब्दफराळ भरणपोषण करील असे मत व्यक्त केले.

COMMENTS