Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आनंद शिंदे यांच्या पुतण्याचे दुःखद निधन

मुंबई - गेली अनेक दशके रसिकांच्या मनावर पहाडी आवाजानं अधिराज्य गाजवणाऱ्या शिंदे घरण्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबातला तरुण आवाज हरपल्य

आजचे राशीचक्र रविवार, ३१ ऑक्टोबर २०२१ अवश्य पहा
शिक्रापूरात व्यापारी व ग्रामस्थांचा कडकडीत बंद
काॅंग्रेस पुन्हा जेष्ठांकडेच ! 

मुंबई – गेली अनेक दशके रसिकांच्या मनावर पहाडी आवाजानं अधिराज्य गाजवणाऱ्या शिंदे घरण्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबातला तरुण आवाज हरपल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रल्हाद शिंदे यांचा नातू आणि आनंद शिंदे यांचा पुतण्या सार्थक शिंदे याचं निधन झाल्याचं समोर आलं आहे.प्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांच्यापासून सुरू झालेला हा गायकीचा वारसा पुढं आनंद, मिलिंद शिंदे यांनी जपला आहे. आताच्या पिढीतील उत्कर्ष, मधुर आणि आघाडीचा गायक आदर्श शिंदे यांनी यामध्ये आणखी वैविध्य आणि आधुनिकता आणत प्रेक्षकांना आपल्याशी जोडलं आहे. शिंदे कुटुंबाताली दिनकर शिंदे यांचा मुलगा सार्थक शिंदे याचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची माहिती आहे. ३१ जुलै त्यानं अखेरचा श्वास घेतला. तबला आणि ढोलवादक म्हणूनही तो लोकप्रिय होता.सार्थक याच्या निधाननं शिंदेशाहीतला एक तारा निखळ्याच्या भावना चाहते व्यक्त करत आहेत. गायक आणि अभिनेता उत्कर्ष शिंदे यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चुलत भावाला श्रद्धांजली वाहिली आहे. तुझ्या सारखा कलाकार होणे नाही, तुझी खूप आठवण येईल, असं उत्कर्षनं म्हटलं आहे.

COMMENTS