Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सचिन तेंडुलकरच्या सुरक्षारक्षकाची आत्महत्या

मुंबई : प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरच्या घरी सुरक्षेत तैनात असलेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आ

वडवणी येथील अल्पभूधारक शेतकर्‍याची आत्महत्या
एफटीआयच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन केली आत्महत्या.
यु ट्यूब चॅनलला कमी व्ह्यूज मिळाल्याने तरुणाची आत्महत्या.

मुंबई : प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरच्या घरी सुरक्षेत तैनात असलेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. स्वत:च्या घरी असताना त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
प्रकाश कापडे असे या सुरक्षा रक्षकाचे नाव असून, त्याने जळगाव जिल्ह्यातील जामनेर इथे आपल्या राहत्या घरी स्वत:ला संपवले आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. मागच्या 15 वर्षांपासून एसआरपीएफच्या सेवेत असलेल्या प्रकाश कापडे यांनी मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडेही सुरक्षारक्षक म्हणून काम केले होते. सध्या ते सचिनच्या मुंबईतील घरी सुरक्षेत तैनात होते. आठवडाभरापूर्वी ते जामनेर इथल्या गणपती नगर भागातील आपल्या घरी परतले होते. गणपती नगर येथील घरी आले होते. बुधवारी पहाटे घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या घटनेनंतर कापडे यांच्या घरीबाहेर आजूबाजूच्या लोकांनी व बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

COMMENTS