Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

न्यायाधीशपदी निवड झालेबद्दल सचिन साळुंखे यांचा सत्कार

इस्लामपूर / प्रतिनिधी : विद्यार्थी काळापासून आमच्याबरोबर कार्यरत असलेले सचिन यांची पुढे जाऊन न्यायाधीश निवड होणे हा आमच्यासाठी खूप गौरवशाली क्षण

प्रकाश संकुलाच्या कर्मचार्‍यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम मंत्री जयंत पाटील करतात : अभिजित पाटील
हळदीवर अडत्या जीएसटी न आकारण्याचा निर्णय
सैन्य भरतीसाठी घेतलेले पैसे परत देण्यास टाळाटाळ; युवकाचे अपहरण

इस्लामपूर / प्रतिनिधी : विद्यार्थी काळापासून आमच्याबरोबर कार्यरत असलेले सचिन यांची पुढे जाऊन न्यायाधीश निवड होणे हा आमच्यासाठी खूप गौरवशाली क्षण आहे. सेलटॅक्स निरीक्षक, पोलीस निरीक्षक पदावरती त्यांची नियुक्ती झाली होती. स्वतःची अभ्यासू जिज्ञासू वृत्ती दाखऊन देत स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या तरुणांनी त्याचा आदर्श घेणे गरजेचे असल्याचे सम्राट महाडीक यांनी सांगितले.
नूतन न्यायाधीश सचिन साळुंखे म्हणाले, जिद्द, चिकाटी व सातत्य हीच अधिकारी होण्याची गुरूकिल्ली आहे. एक मन म्हणत होत की हे सगळं बंद करून आपला व्यवसाय करावा पण एक मन तयार होत नव्हते. पण मी तयार नसणार्‍या मनाचे ऐकले आणि उशिरा का होईना यश मिळाले.
यावेळी महाडीक युवाशक्ती अध्यक्ष सुजित थोरात, व्यंकटेश्‍वरा शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक प्रा. महेश जोशी, माजी नगरसेवक अमित ओसवाल, धीरज कबुरे, प्रसाद बाबर, बबन भुरे, पै. बबन शिंदे, शुभम शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS