Homeताज्या बातम्याविदेश

रशियाची युद्ध थांबवण्यासाठी चर्चेची तयारी

मात्र युक्रेनसमोर घातल्या कठोर अटी

मास्को/वृत्तसंस्था ः रशिया-युक्रेन युद्धाला सुरूवात होऊन तब्बल 10 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला असला तरी, रशियाला अद्याप युक्रेन ताब्यात घेता

शरीरसौष्ठव स्पर्धेत रॉबी मैथीई, सुनंदा साळुंखे यांनी पटकावले पारितोषिक
राज्य गारठले ; पिकांचे मोठे नुकसान ; उत्तर, मध्य पश्‍चिम, दक्षिण महाराष्ट्रात शेतकरी हवालदिल
कोरोनामुळे बैलगाडी शर्यतीवर बंदी : रामदास आठवलेंचा जावईशोध

मास्को/वृत्तसंस्था ः रशिया-युक्रेन युद्धाला सुरूवात होऊन तब्बल 10 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला असला तरी, रशियाला अद्याप युक्रेन ताब्यात घेता आलेला नाही. कारण युक्रेनने कडवा प्रतिकार देत युद्ध सुरू ठेवल्यामुळे रशियाची देखील मोठया प्रमाणावर आर्थिक हानी झाली असून, इतर देशांनी रशियाची आर्थिक कोंडी केली आहे. या पार्श्‍वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी युद्ध थांबवण्यासाठी चर्चेची तयारी दाखवली आहे. मात्र त्यांनी काही गंभीर अटी घातल्यामुळे युक्रेन या अटी मान्य करण्याची शक्यता नाहीच.

रशिया सरकारकडून अधिकृतरित्या चर्चेची तयारी दर्शवली आहे. काही मुद्द्यांवर युक्रेनशी झालेल्या मतभेदामुळे टोकाला जात रशियाने मागील वर्षी फेब्रुवारीच्या अखेरीस युक्रेनवर लष्करी हल्ला केला होता. बलाढ्य रशियापुढे युक्रेनचा निभाव लागणार नाही, असा जगाचा होरा होता. मात्र, झेलेन्स्की यांच्या हिकमती नेतृत्वाखाली युक्रेनने चिवटपणे झुंज देत रशियाचे मनसुबे उधळून लावले आहेत. युक्रेनची जनता व सैन्य गनिमी काव्याने रशियाच्या हल्ल्यांना तोंड देत आहे. त्यामुळे हे युद्ध लांबले असून त्याचे परिणाम जगाच्या अर्थकारणावरही होत आहेत. स्वत:च्या देशातील जनतेसह जगभरातून येणारा दबाव आणि निर्भेळ यश मिळण्याची शक्यता दुरापास्त असल्याचं लक्षात आल्याने पुतीन यांनी आता चर्चेची तयारी दाखवली आहे. रशियन सरकारने तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांच्या माध्यमातून पुतीन यांनी चर्चेसाठी काही अटी घातल्या आहेत. रशियन सैन्यानं सध्या ताब्यात घेतलेला प्रदेश युक्रेननं सोडावा, अशी प्रमुख अट पुतीन यांनी घातली आहे. युक्रेनने रशियाच्या विरोधात पाश्‍चिमात्त्य देशांची मदत घेणे थांबवावे, पाश्‍चिमात्त्य देशांकडून मिळालेल्या लष्करी मदतीची संपूर्ण माहिती युक्रेनने खुली करावी, असेही रशियाने म्हटले आहे. ख्रिसमसच्या सुट्टीच्या पार्श्‍वभूमीवर पुतीन यांनी रशियन सैन्याला 36 तासांसाठी युद्ध थांबवण्याचे आदेश दिले आहेत. रशियन ऑर्थोडॉक्स चर्चचे प्रमुख पॅट्रिआर्क किरिल यांच्या प्रस्तावानंतर हा आदेश देण्यात आला आहे. पुतीन यांचा हा आदेश सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

ताब्यात घेतलेला प्रदेश युक्रेनने सोडण्याची मागणी – रशियन सरकारने तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांच्या माध्यमातून पुतीन यांनी चर्चेसाठी काही अटी घातल्या आहेत. रशियन सैन्याने सध्या ताब्यात घेतलेला प्रदेश युक्रेनने सोडावा, अशी प्रमुख अट पुतीन यांनी घातली आहे. रशियन सैन्याने पूर्व आणि दक्षिण युक्रेनचा मोठा भूभाग व्यापला आहे. त्यात डोनेस्तक, लुगान्स्क, झापोरिझिया आणि खेरसन या प्रदेशांचा समावेश आहे. अर्थात, यावर रशियाला अद्याप पूर्ण नियंत्रण मिळवता आलेले नाही. तरीही हा प्रदेश रशियाला द्यावा, असे पुतीन यांचे म्हणणे आहे. मात्र युक्रेनने आपल्या नागरिकांची जीव धोक्यात घालून युद्ध पत्करल्यानंतर युक्रेन माघार घेण्याची शक्यता तशी कमीच आहे. त्यामुळे एकतर रशियाला आपल्या अटी शिथील कराव्या लागणार आहे. तरच युद्धविराम होण्याची शक्यता आहे.

COMMENTS