Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शनिशिंगणापुरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी

अहिल्यानगर : शनिशिंगणापुरात काल शनिवारी तब्बल 4 लाखांहून अधिक भाविकांनी शनिदेवाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास

Shrirampur : शेततळ्यात बुडून तीन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू (Video)
कोपरगाव शहराच्या विविध प्रभागात विकासाची घौडदौड सुरूच
राहीबाई पोपेरे यांची बीज राखीच्या रूपाने अनोखी भेट

अहिल्यानगर : शनिशिंगणापुरात काल शनिवारी तब्बल 4 लाखांहून अधिक भाविकांनी शनिदेवाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास शनिअमावश्या सुरू झाली. तेव्हा सकाळी गर्दी अतीअल्प होती, त्यानंतर दुपारपासून भाविकांचा शिंगणापूरकडे ओघ वाढला. वाहनाच्या रांगा लागल्या होत्या, पार्किंग व्यवस्था मुळा कारखाना, घोडेगाव रोड, संभाजी नगर हाइवे, कंगोणी रोड, आदी ठिकाणी केली होती.
दुपारपासून दर्शनरांगेत सुरू राहिलेली भाविकांची गर्दी सायंकाळपर्यंत टिकून होती. शिंगणापूरकडे येणार्‍या मुख्य रस्त्यांवर वाहनाची वर्दळ वाढली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबोर्गे, शेवगाव उपविभागीय पोलिस उपअधीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक खगेन्द्र टेंबेकर, सपोनी. विजय माळी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शनिवारी सकाळपासून शिंगणापूरात वाहनांची संख्या वाढत होती तरी वाहतूक कोंडी मात्र कुठेही दिसली नाही. शिंगणापुरातील मुख्य चौकासह शनिवारी पोलिस बंदोबस्तही वाढवण्यात आलेला होता. भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडत असलेल्या हजारो भाविकाना या शनिभक्त खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात आला. शनैश्‍वर देवस्थानच्या प्रसादालयात शनिवारी सायंकाळपर्यंत अनेक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. शनिवारी व आजही रविवारी सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची अशीच गर्दी राहील, असा अंदाज आहे. शनिवारी सकाळची आरती माजी खासदार चंद्रकांत खैरे व, तर दुपारची आरती शानिभक्त जयेश शहा, तर सायंकाळी आरती उद्योगपती सौरभ बोरा, शनिभक्त राहुल हेगडे, यांच्या हस्ते करण्यात आली. शनी अमावस्या यात्रा निमित्ताने आ. शिवाजी कर्डिले, आ.विठ्ठलराव लघें, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे,नागपूर महानगरपालिकेचे उपमहापौर वैभव जोशी,मराठा महासंघाचे नेते संभाजी दहातोंडे,सह शनिदेवाचे दर्शन घेतले. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई,फुलांची सजावट,केलेली होती.मंदिरपरिसरात भाविकांना ठिकठिकाणी पाणी व्यवस्था, भंडारा प्रसादाचे वाटप करण्यात येत होते. देवस्थानचे वतीने अध्यक्ष भागवत बानकर,उपाध्यक्ष विकास बानकर, अँड सायारम बानकर,चिटणीस आप्पासाहेब शेटे, विश्‍वस्त पोपटराव शेटे,आदीनी मान्यवरांच्या स्वागत केले. आरोग्य सेवा देवस्थान हॉस्पिटल व सोनई प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी पुरवल्या.

COMMENTS