Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रूपयाची आतापर्यंतची नीचांकी घसरण ; अमेरिकेच्या व्यापारयुद्धाचा परिणाम

नवी दिल्ली :अमेरिकेने कॅनडा मेक्सिकोवर 25 टक्के आयातशुल्क तर, चीनवर 10 टक्के आयातशुल्क लावल्यामुळे जगभरात अमेरिकेने पुकारलेल्या व्यापारयुद्धामुळे

स्वामीकृपा प्रसादाने इंग्लंडमध्ये शिकत असलेला डॉक्टर जावई मिळाला | Shri Swami Samarth Maharajanche Anubhav | LokNews24
स्वामी विभूती म्हणजे भक्तांचे रक्षणकवच l जय स्वामी समर्थ l LOKNews24
फलटण तालुक्यातील खाणीत परप्रांतियाचा मृत्यू
the Indian Rupee Symbol

नवी दिल्ली :अमेरिकेने कॅनडा मेक्सिकोवर 25 टक्के आयातशुल्क तर, चीनवर 10 टक्के आयातशुल्क लावल्यामुळे जगभरात अमेरिकेने पुकारलेल्या व्यापारयुद्धामुळे सोमवारी भारतीय रूपया देखील नीचांकी पातळीवर घसरल्याचे दिसून आले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाने पहिल्यांदाच 87 पार केला आहे. मागील काही महिन्यात रुपयाची मोठ्या प्रमाणात पडझड सुरु आहे. आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांना रुपया 87 रुपयांपर्यंत मार्च महिन्यापर्यंत घसरेल, असा अंदाज होता. मात्र, फेब्रुवारीच्या तिसर्‍याच दिवशी डॉलरच्या तुलनेत रुपयाने नीचांकी पातळी गाठली आहे. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 86.61 वर बंद झाला होता. मात्र, सोमवारी रूपया डॉलरच्या तुलनेत तब्बल 87.12 रूपये प्रती डॉलरवर आला आहे.
ट्रम्प यांनी 20 जानेवारी रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेताच भारतीय शेअर बाजारातील परदेशी गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावला आहे. तेव्हापासून भारतीय शेअर बाजार कोसळतांना दिसून येत आहे, त्यातच रूपया घसरतांना दिसून येत आहे, त्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिका आणि इतर देशांमध्ये सुरु झालेल्या व्यापारयुद्धाचा परिणाम इतर देशांवर व्हायला सुरुवात झाली आहे. अमेरिकेने कॅनडा आणि मेक्सिकोवर आयातशुल्क लादण्याची घोषणा केली. त्यानंतर कॅनडा आणि मेक्सिकोने देखील अमेरिकेला जशास तसे उत्तर देत त्यांच्यावर देखील आयातशुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यापार युद्धाचा परिणाम आशियामधील देशांच्या चलनावर दिसून आला. भारताच्या रुपयामध्ये देखील घसरण दिसून आली. भारताचा रुपया डॉलरच्या तुलनेत 87.12 रुपयांवर पोहोचला. कोरिया, मलेशिया इंडोनेशिया आणि थायलंड या देशांच्या चलनामध्ये देखील घसरण पाहायला मिळाली.

COMMENTS