मुंबई ः अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी काही मद्यधुंद तरुणांनी पाठलाग केल्याचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी या संदर्भा

मुंबई ः अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी काही मद्यधुंद तरुणांनी पाठलाग केल्याचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी या संदर्भात फेसबुकवर पोस्ट करत महिलांना सक्षम राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच दारू पिऊन फिरणार्या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. दोन मद्यधुंद तरुणांनी रुपाली आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिलेचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असे रुपाली यांनी म्हटले आहे.
COMMENTS