Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेर शहरातील रस्त्यांसाठी ५ कोटी मंजूर – आ. खताळ

संगमनेर : संगमनेर नगरपरिषदेच्या हद्दीतील २१ रस्त्यांच्या विकास कामासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने विशेष रस्ता अनुदान अंतर्गत ५ कोटी रुपया

संगमनेर येथे कन्फर्मेशन डीड नोंदणी पूर्ण करण्यासाठी तीन दिवसांचे विशेष शिबिर – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
हरीबाबा देवस्थानला “क” वर्ग  दर्जा मिळून दिल्याबद्दल आ. सत्यजित तांबे यांचा सत्कार
गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात
Displaying PHOTO-2025-10-18-12-07-22.jpg

संगमनेर : संगमनेर नगरपरिषदेच्या हद्दीतील २१ रस्त्यांच्या विकास कामासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने विशेष रस्ता अनुदान अंतर्गत ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आ. अमोल खताळ यांनी दिली. 

       संगमनेर शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्याकरिता नगरविकास विभागाच्या माध्यमातून विशेष रस्ता अनुदान मिळावे, यासाठी आ. अमोल खताळ यांनी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी “नगरोत्थान महाभियान” योजनेतून संगमनेर शहरासाठी विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. संगमनेर शहरासाठी दिलेल्या भरीव निधीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील  यांचे आभार आ. खताळ पाटील यांनी आभार मानले आहेत .

संगमनेर शहरातील खालील रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळाली आहे.

नवीन नगर रोड रस्ता, गणेश नगर परिवार किराणा पाठीमागील गल्ली, कुंथूनाथ सोसायटी रस्ता, पद्मा नगर नगरपालिका गल्ली, आशीर्वाद स्टेट बँक कॉलनी रस्ता, मालदाड रोड बाळेश्वर कॉलनी रस्ता, शिवाजीनगर गल्ली नंबर १ व २, सरस्वती हॉटेल शेजारील रस्ता, बजाज शोरूम समोरील जनतानगर कडे जाणारा रस्ता, पोफळे मळा हनुमान मंदिर ते इंदिरानगर पटांगण पर्यंत रस्ता, अभंग मळा बालाघरे ते गोडसे डांबरीकरण, वकील कॉलिनी रस्ता, देवाचा मळा मिसाळ ते वावळ यांच्या घरापर्यंत, आनंद ऋषी बँक, वजीर इंटरप्राईजेस जाणता राजा मार्ग पासून यशोदा बंगल्या जवळील खांबापर्यंत रस्ता, आनंद ऋषी पतसंस्था ते बाफना यांचे घरापर्यंत रस्ता, पद्मरसिक शहा विद्यामंदिर, ज्ञानेश्वर गल्ली पासून घासबाजारापर्यंत रस्ता , अकोले नाका ते गवंडीपुरा मस्जिद पर्यंत रस्ता, पार्श्वनाथ गल्ली ते माऊली किराणा पर्यंत रस्ता, घोडेकर मळा आसावा ते साई नगर हिरे यांचे घरापर्यंत रस्ता, गजानन महाराज मंदिराच्या डाव्या व उजव्या समोरील रस्ता, परदेशपुरा ते धाकटे राम मंदिर उपासनी गल्ली येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे.

COMMENTS