Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रोटरी व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ने ज्येष्ठ संगणक तज्ञ सौ. जया पानवलकर सन्मानित

पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ यांच्या वतीने दिला जाणारा 'रोटरी व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड' ज्येष्ठ संगणक तज्ञ सौ. जया प्रमोद पानवलकर यांना प्रदान

वाळू मॅनेजरकडून ट्रॅक्टरखाली चिरडून मारण्याची धमकी
महत्त्व मकर संक्रांतीचे | LokNews24
बीड जिल्ह्यातील उच्च दाब वितरण प्रणाली आणि सौरपंपाबाबत बैठक घेणार – ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ यांच्या वतीने दिला जाणारा ‘रोटरी व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ ज्येष्ठ संगणक तज्ञ सौ. जया प्रमोद पानवलकर यांना प्रदान करण्यात आला. तंत्रज्ञान आणि व्यवसायिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सौ. पानवलकर यांना सन्मानित करण्यात आले.

सेवासदन इंग्लिश मिडीयम स्कूल ‘एमसीसीएआय’च्या मुळगावकर सभागृहात झालेल्या या सोहळ्यात रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३१चे निर्वाचित प्रांतपाल रो. मंजू फडके यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून पी.डि.जी. भाऊसाहेब कुदळे, क्लब अध्यक्ष रवींद्र प्रभुणे, सेक्रेटरी किरण वेलणकर, पी.पी. अभिजित जोग, डॉ. गोरे, पी. ई. डॉ. मंदार अंबिके, प्रेसिडेंट नोमिनी ऍड. मनीषा बेलगावकर यांच्या सह क्लबचे सभासद उपस्थित होते.

पुरस्काराला उत्तर देताना सौ. जया पानवलकर यांनी आपल्या जीवनातील काही आठवणींना उजाळा देत पुरस्काराबद्दल आयोजकांचे आभार मानले. आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) क्षेत्रात होणारे चांगले बदल समाज हिताचेच आहे. काही काळातच रस्त्यावर आपल्याला ड्राइवर रहित गाड्या पाहायला मिळतील यात शंका नाही; मात्र कुणाच्याही रोजगारावर याचा काही परिणाम होणार नाही असा दिलासा देखील त्यांनी दिला.

प्रांतपाल मंजू फडके म्हणाल्या, यशाची कितीही मोठी उंची गाठली तरी देखील जमीन न सोडनारी व्यक्ती म्हणजे जया पानवलकर. महिला सबलकरणासाठी अनेक काम सर्वत्र चालू आहेत. भविष्याच्या दृष्टीने AI च्या माध्यमातून जर कार्य करण्यासाठी आपण एकत्र येऊन काम करू शकलो तर नक्कीच आवडेल असे म्हणत त्यांनी सौ. पानवलकर यांना शुभेच्छा दिल्या. पी.डि.जी. भाऊसाहेब कुदळे यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

COMMENTS