Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रोटरी क्लब अकोले तीन पुरस्कारांनी सन्मानित

अकोले ः सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व पर्यावरण क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल 14 जिल्ह्याचा रोटरी क्लबचा  एक असलेल्या डिस्ट्रिक्ट रोटरी क्लबच्या वत

Ram Kadam | 12 आमदारांचे निलंबन ही संविधानाची पायमल्ली |LOKNews24
नागवडेची बाजार भावाची घोषणा म्हणजे मृगजळ : केशवराव मगर
LOK News 24 Iराहुरीतील फॅशन शु पॅलेस दुकान ७ दिवस सील

अकोले ः सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व पर्यावरण क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल 14 जिल्ह्याचा रोटरी क्लबचा  एक असलेल्या डिस्ट्रिक्ट रोटरी क्लबच्या वतीने रोटरी क्लब अकोले सेन्ट्रलला तीन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. रविवारी 4 ऑगस्ट रोजी पाचगणी येथे ’परिवर्तन अवॉर्ड सोहळ्यामध्ये ’स्त्री जन्माचे स्वागत’ या उपक्रमामध्ये चांगले कार्य करून तिसरा क्रमांक मिळविल्याबद्दल ’सेव्ह द गर्ल ट्रॉफी’ने सन्मानित करण्यात आले. तर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मध्ये ठरवून दिलेल्या विविध ’परिवर्तन प्रोजेक्ट्स’ मध्ये विशेष सहभागी होऊन उपक्रम राबविण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल  ’ स्पेशल एफर्ट्स ऑन परिवर्तन प्रोजेक्टस’ ही दुसरी ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले तर डिस्ट्रिक्ट 3132 ने ठरवून दिलेले उद्दिष्टांपैकी 5 उद्दिष्टे यशस्वी पणे  पूर्ण केल्याबद्दल  सायटेशन सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी डिस्ट्रिक्ट 3132 च्या  डिस्ट्रिक्ट गव्हर्नर स्वाती हेरकल, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी प्रमोद शिंदे,असिस्टंट गव्हर्नर दीपक मनियार आदींच्या उपस्थितीमध्ये सन्मानित करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब अकोले सेंट्रल चे सन2023-24 चे सेक्रेटरी तथा विद्यमान अध्यक्ष प्रा. विद्याचंद्र सातपुते, विद्यमान सेक्रेटरी अमोल देशमुख, संस्थापक अध्यक्ष अमोल वैद्य, रोटरी क्लब चे पब्लिक इमेज असलेले हभप दीपक महाराज देशमुख, माजी अध्यक्ष सचिन देशमुख, माजी अध्यक्ष सचिन शेटे, डिस्ट्रिक्ट डायरेक्टर डॉ. सुरींदर वावळे,पर्यावरण डायरेक्टर संदीप मालुंजकर, माजी खजिनदार रोहिदास जाधव, माजी खजिनदार गंगाराम करवर, सदस्य अनिल देशमुख, विजय पावसे, हेमंत मोरे, निलेश देशमुख हे उपस्थित होते. सन 2023-24 या वर्षाचे अध्यक्ष सुनील नवले, सेक्रेटरी विद्याचंद्र सातपुते, उपाध्यक्ष डॉ. जयसिंग कानवडे,खजिनदार दिनेश नाईकवाडी यांचे सह बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, सदस्य यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

COMMENTS