Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल

मुरूड प्रतिनिधी - आज जरी सुनील तटकरे हे अजित पवार यांच्यासोबत दिसत असले तरी जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये जायची वेळ येईल तेव्हा अजित पवारांच

आहिल्यादेवी होळकर जयंतीला यात्रा काढणारच : आ रोहित पवार
रोहित पवारांचा पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा
अ‍ॅमेझॉन देणार कर्जत-जामखेडच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण  

मुरूड प्रतिनिधी – आज जरी सुनील तटकरे हे अजित पवार यांच्यासोबत दिसत असले तरी जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये जायची वेळ येईल तेव्हा अजित पवारांची साथ सोडणारे पहिले नेते तटकरे हेच असतील अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी हल्ला चढवला. भाजपमध्ये जायची वेळ आल्यावर तटकरे सर्वात पहिली उडी मारतील अशी घणाघाती टीका रोहित पवार यांनी केली. मुरूडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

यावेळी रोहित पवार यांनी सुनील तटकरेंवर सडकून टीका केली. सुरूवातीच्या काळात तटकरे हे बॅरीस्टर अंतुलेंसोबत होते, त्यांनी त्यांची साथ सोडली. नंतर त्यांनी शरद पवार साहेबांची साथ सोडली. शेकापच्या जयंत पाटील यांच्यासोबत ते होते, त्यांनी जयंत पाटील यांचीही साथ सोडली. आता सध्या ते अजित पवार यांच्यासोबत आहेत. पण जेव्हा वेळ येईल तेव्हा अजित पवार यांची साथ सोडणारे तटकरे हे पहिली व्यक्ती असतील अशा शब्दांत रोहित पवार यांनी तटकरेंवर हल्ला चढवला. स्वहितासाठी ते इकडून तिकडे उड्या मारणार असतील तर विचार करण्याची, निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असेही रोहित पवार म्हणाले.

COMMENTS