अकोले : आपली सुरवात अथवा आयुष्याचा प्रारंभ ही मर्यादा नसावी, स्वप्नांसाठी जागे रहा. पाठपुरावा करा. न्यूनगंड काढून टाकावा. आत्मविश्वास सातासमुद्राप

अकोले : आपली सुरवात अथवा आयुष्याचा प्रारंभ ही मर्यादा नसावी, स्वप्नांसाठी जागे रहा. पाठपुरावा करा. न्यूनगंड काढून टाकावा. आत्मविश्वास सातासमुद्रापार नेऊ शकतो. प्रवास खडतर असतो, सोपे काहीच नसते असे प्रतिपादन ग्लोबल नगरी फाउंडेशन अमेरिकाचे उपाध्यक्ष रोहित काळे यांनी केले. अगस्ती महाविद्यालयातील ५० व्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कायम विश्वस्त गिरजाजी जाधव होते.
विख्यात गायक आणि युट्युबर गुर आशीष पाल सिंह यांनी ‘आत्मिक ज्ञान तोलामोलाचे असते असे सांगून अगस्ती मुनींनी चिंता मुक्तीची शिकवण जगाला देऊन आध्यात्मिक बळ दिले असे सांगून विविध हिंदी गीतांचे सादरीकरण केले. शिक्षण अभ्यासक दीपा नायर यांनी आपल्या मनोगतात आत्मविश्वास तसेच परिश्रमाचे महत्व प्रतिपादन केले.
अगस्ती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भास्कर शेळके यांनी स्वागत आणि प्रास्ताविक करताना महाविद्यालयातील नव्या युगाच्या जडणघडणीतील विविध उपक्रमांचा तसेच राज्य स्तरावरील विद्यार्थ्यांच्या यशस्वी प्रगतीचा उंचावणारा आलेख व्यक्त केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अकोले ता. एज्युकेशन सोसायटीचे कायम विश्वस्त गिरजाजी जाधव यांनी महाविद्यालयीन प्रगतीत प्राचार्य डॉ. शेळके यांनी पार पाडलेल्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.
याप्रसंगी व्यासपीठावर गिरजाजी जाधव, स्वीकृत विश्वस्त संपतराव वैद्य, अध्यक्ष सुनील दातीर, खजिनदार धनंजय संत, कार्यकारिणी सदस्य रमेश जगताप, प्राचार्य डॉ. भास्कर शेळके, शिक्षणाधिकारी संपत मालुंजकर, पॉलिटिकचे प्राचार्य आर. डी. पल्हाडे, उपप्राचार्य डॉ.साहेबराव गायकवाड, डॉ.अशोक दातीर, प्रा.चांगदेव डोंगरे, प्रा.व्ही.व्ही.वाकचौरे, डॉ.सुनील शिंदे, प्राचार्या मीना नवले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS