देवदर्शनास चाललेल्या युवकाला लुटले…दोघांना पकडले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवदर्शनास चाललेल्या युवकाला लुटले…दोघांना पकडले

अहमदनगर/प्रतिनिधी : देवदर्शनास चाललेल्या युवकाला लुटणार्‍या दोघांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. भिंगार कॅम्प पोलिसांनी ही कामगिरी केली. देवदर्शनास च

कोरोनासह स्वाईन फ्लूचीही होणार तपासणी
दुधाचे दर न वाढविल्यास घालणार राडा
ईद निमित्त श्रीगोंद्यात मुस्लिम समाजाने केले रक्तदान शिबीराचे आयोजन

अहमदनगर/प्रतिनिधी : देवदर्शनास चाललेल्या युवकाला लुटणार्‍या दोघांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. भिंगार कॅम्प पोलिसांनी ही कामगिरी केली. देवदर्शनास चाललेल्या युवकाला शिवीगाळ करत लुटणार्‍या दोघांना भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली. सचिन गोपीनाथ चव्हाण (वय 21) व रघुनाथ भारत बर्डे (वय 27 दोघे रा. चोभा निमगाव ता. आष्टी जि. बीड) अशी अटक केलेल्या लुटारूंची नावे आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
28 जानेवारी 2022 रोजी दुपारी आदित्य आळेकर हा युवक वारूळवाडी (ता.नगर) रोडने देवदर्शनासाठी जात होता. त्यावेळी दुचाकीवरून (एमएच 23 बीडी 8163) आलेल्या दोघांनी आदित्यला अडवून शिवीगाळ केली व त्याच्या खिशातील तीन हजार 400 रुपये रोख रक्कम तसेच त्याच्याजवळील 15 हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा 18 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल लुटला होता. दाखल झालेल्या या लुटीच्या गुन्ह्याचा तपास भिंगार कॅम्प पोलिसांकडून सुरू होता. आदित्य आळेकर याला लुटणार्‍या आरोपींची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी सापळा रचला. दोन्ही आरोपींना पकडण्याची कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे, भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बेंडकोळी यांच्या पथकाने केली. या प्रकरणी आदित्य अविनाश आळेकर (वय 21, रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, बुर्‍हाणनगर ता. नगर) याने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द भारतीय दंड विधान कायदा कलम 392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पकडलेल्या दोन्ही आरोपींकडे पोलिसांकडून चौकशी सुरू असून, त्यांनी अशा लुटमारीचे आणखी काही गुन्हे केले काय, याची माहिती घेतली जात आहे.

COMMENTS