Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रस्ते आणि शिक्षण विकासाच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू-आ.आशुतोष काळे 

माहेगाव देशमुख येथे रस्ता, शाळा खोल्यांचे भूमिपूजन  कोपरगाव :  चांगले रस्ते म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्याचा आत्मविश्वास, तर प्रशस्त, सुरक्षित आणि सुसज्ज शाळा खोल्या म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी आहे. जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इतर शाळांमधील विद्यार्थ्यांप्रमाणेच समान संधी उपलब्ध होत आहेत. आवश्यक शैक्षणिक सोयी-सुविधा मिळाल्यामुळे पूर्वी खासगी किंवा इतर शाळांकडे वळणारा विद्यार्थी आता जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेत आहे. यामुळे शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत असून शिक्षणाचा दर्जाही सुधारत आहे. रस्त्यांची चांगली सुविधा असल्यास विद्यार्थ्यांना नियमितपणे शाळेत येणे सोपे होते आणि पालकांचाही विश्वास वाढतो. त्यामुळे रस्ते विकास हा थेट शैक्षणिक प्रगतीशी जोडलेला असून रस्ते आणि शिक्षण विकास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.  कोपरगाव मतदार संघातील माहेगाव देशमुख येथे सचिन खर्डे घर ते ग्रा.मा. १०१ रस्ता करणे (५० लाख), जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ०३ खोल्या बांधणे (३६ लाख) या एकूण ८६ लाखाच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ०२ खोल्या (२४ लाख) या कामाचे लोकार्पण आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी ते बोलत होते.  ते पुढे म्हणाले की, माहेगाव देशमुखच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील जुन्या खोल्या जीर्ण झाल्यामुळे दोन नव्या खोल्यांसाठी मंजूर करून आणलेल्या निधीतून पूर्ण झालेल्या शाळा खोल्यांचे लोकार्पण करण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खाजगी शाळेच्या विद्यार्थ्यांप्रमाणे आधुनिक शैक्षणिक सुविधा मिळाव्यात तसेच शाळेची विद्यार्थी संख्या वाढावी यासाठी आणखी तीन नव्या खोल्यांसाठी निधी आणला असून त्या खोल्यांचे भूमिपूजन करण्यात आले असून या खोल्यांचे कामही उत्कृष्ठ पद्धतीने लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. याप्रसंगी माहेगाव देशमुख ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य व सोसायटीचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक मंडळ, श्री अमृतेश्वर महादेव मंदिर, श्री दत्तदिगंबर देवस्थान व श्री मारुती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त, विविध क्षेत्रातील मान्यवर व माहेगाव देशमुख ग्रामस्थ उपस्थित होते.

संभाव्य आपत्ती निवारणासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे ः आ. आशुतोष काळे
कार्यकर्त्यांना जीव लावणारे नेतृत्व हरपले : आ. काळे
जिमचे साहित्य खरेदीसाठी ७० लाखांचा निधी : आ.काळे

माहेगाव देशमुख येथे रस्ता, शाळा खोल्यांचे भूमिपूजन 

कोपरगाव :  चांगले रस्ते म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्याचा आत्मविश्वास, तर प्रशस्त, सुरक्षित आणि सुसज्ज शाळा खोल्या म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी आहे. जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इतर शाळांमधील विद्यार्थ्यांप्रमाणेच समान संधी उपलब्ध होत आहेत. आवश्यक शैक्षणिक सोयी-सुविधा मिळाल्यामुळे पूर्वी खासगी किंवा इतर शाळांकडे वळणारा विद्यार्थी आता जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेत आहे. यामुळे शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत असून शिक्षणाचा दर्जाही सुधारत आहे. रस्त्यांची चांगली सुविधा असल्यास विद्यार्थ्यांना नियमितपणे शाळेत येणे सोपे होते आणि पालकांचाही विश्वास वाढतो. त्यामुळे रस्ते विकास हा थेट शैक्षणिक प्रगतीशी जोडलेला असून रस्ते आणि शिक्षण विकास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

 कोपरगाव मतदार संघातील माहेगाव देशमुख येथे सचिन खर्डे घर ते ग्रा.मा. १०१ रस्ता करणे (५० लाख), जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ०३ खोल्या बांधणे (३६ लाख) या एकूण ८६ लाखाच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ०२ खोल्या (२४ लाख) या कामाचे लोकार्पण आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी ते बोलत होते.

 ते पुढे म्हणाले की, माहेगाव देशमुखच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील जुन्या खोल्या जीर्ण झाल्यामुळे दोन नव्या खोल्यांसाठी मंजूर करून आणलेल्या निधीतून पूर्ण झालेल्या शाळा खोल्यांचे लोकार्पण करण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खाजगी शाळेच्या विद्यार्थ्यांप्रमाणे आधुनिक शैक्षणिक सुविधा मिळाव्यात तसेच शाळेची विद्यार्थी संख्या वाढावी यासाठी आणखी तीन नव्या खोल्यांसाठी निधी आणला असून त्या खोल्यांचे भूमिपूजन करण्यात आले असून या खोल्यांचे कामही उत्कृष्ठ पद्धतीने लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. याप्रसंगी माहेगाव देशमुख ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य व सोसायटीचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक मंडळ, श्री अमृतेश्वर महादेव मंदिर, श्री दत्तदिगंबर देवस्थान व श्री मारुती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त, विविध क्षेत्रातील मान्यवर व माहेगाव देशमुख ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS