Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वतंत्र ट्रान्सफार्मरसाठी राजूरी येथे रस्ता रोको

महावितरणच्या अधिकार्‍यांच्या लेखी आश्‍वासनानंतर आंदोलन मागे

जामखेड/प्रतिनिधीः तालुक्यातील राजूरी येथे वारंवार जळणारा ट्रान्सफार्मर बदलून देण्यासाठी व शेती पंपासाठी स्वतंत्र ट्रान्सफार्मर द्यावा. त्यासाठी व

राहाता शहरांमध्ये स्वच्छतेसाठी नागरिकांचे ठिकठिकाणी श्रमदान
जनतेच्या सुरक्षिततेसाठी सज्ज असणार्‍या पोलिस दलास कोरोना संरक्षणासाठी मास्क व सॅनीटायझरचे वाटप
रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांचे नेवासाफाटा येथे शनिवारी आगमन

जामखेड/प्रतिनिधीः तालुक्यातील राजूरी येथे वारंवार जळणारा ट्रान्सफार्मर बदलून देण्यासाठी व शेती पंपासाठी स्वतंत्र ट्रान्सफार्मर द्यावा. त्यासाठी वारंवार मागणी करूनही काही फायदा होत नसल्याने अखेरीस राजूरी ग्रामस्थांनी मोठे रस्तारोको आंदोलन सुरू केले. यावेळी शिर्डी-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गवर दोन्ही बाजूने काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अशावेळी महावितरणच्या अधिकार्‍यांनी तातडीने लेखी आश्‍वासनानंतर दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
राजूरी गावात एकच ट्रान्सफार्मर असून त्यावर जास्तीत जास्त लोड असल्याने  तो वारंवार जळत आहे. अथवा त्यामध्ये बिघाड होत आहे. तो त्वरित बदलून द्यावा. तसेच राजुरी गावठाणासाठी स्वतंत्र ट्रान्सफार्मर व शेतीपंपासाठी स्वतंत्र ट्रान्सफार्मर करून द्यावा. जेणेकरून संपूर्ण गावचा विषय मार्गी लागेल व नागरिकांची गैरसोय दूर होईल. यासाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा लेखी मागणी केली होती.त्यासाठी पाठपुरावा देखील केला. मात्र महावितरणचे अधिकारी कोणतीही दखल घेत नसल्याने किंवा कार्यवाही करत नसल्याने अखेरीस दि. 4 सप्टेंबर रोजी राजूरी येथील बसस्थानकावर ग्रामस्थांनी रस्तारोको अांदोलन केले. याची दखल घेत महावितरण अधिकारी टाक यांनी पुढील 5 दिवसात जळालेला व आणखी 1 नवीन ट्रान्सफार्मर बसवून देण्याचे लेखी आश्‍वासन दिले. त्यानंतर रस्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी राजुरीचे सरपंच सागर कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसिद्धी प्रमुख काकासाहेब कोल्हे, उपसरपंच नानासाहेब खाडे, तंटामुक्ती अध्यक्ष मल्हारी गायकवाड, यांच्यासह राजुरी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. जर लेखी दिलेले आश्‍वासन वेळेत पुर्ण न केल्यास पुन्हा मोठे आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलेला आहे.
-प्रतिक्रिया ः शिर्डी – हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील राजूरी हे मोठं गाव आहे. या ठिकाणी राष्ट्रीयकृत कॅनरा बँक, तिन दुरसंचार टॉवर,पेट्रोल पंप, शाळा आणि महाविद्यालय असून देखील या ठिकाणी वीज नसल्याने गावाचे मोठे नुकसान होते. मात्र वीजेबाबत महावितरणचे अधिकारी नेहमीच उदासिनता दाखवतात. त्यामुळे ग्रामस्थांना रस्तारोको आंदोलन करावे लागले. – काकासाहेब कोल्हे, प्रसिद्धीप्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेस.

COMMENTS