रस्त्यावरचा अपघात !

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रस्त्यावरचा अपघात !

 दोन दिवसांपूर्वी भारताचे प्रसिद्ध उद्योजक सायरस मिस्त्री यांचा अपघाती झालेल्या मृत्यू निमित्त देशात रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचे वास्तव काय, हे

उच्चभ्रू शेतकरी जातींच्या मग्रुरीला नरेंद्र मोदी यांनी ठेचून काढले! 
धर्माचा विवेक शाबूत ठेवा !
शेणाची निवडणूक! 

 दोन दिवसांपूर्वी भारताचे प्रसिद्ध उद्योजक सायरस मिस्त्री यांचा अपघाती झालेल्या मृत्यू निमित्त देशात रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचे वास्तव काय, हे समजून घेऊ.  जागतिकीकरणाचा स्वीकार केल्यानंतर त्यासाठी आवश्यक असणाऱ्या दळणवळणाच्या वेगवान सोयी निर्माण करण्यासाठी देशभरातच रस्त्यांचे जाळे विणले गेले. रस्ते जसेजसे आधुनिक बनत गेले, दुपदरी, चौपदरी आणि आता आठ पदरी रस्त्यांमध्ये रूपांतरित झालेले महामार्ग पाहता एका बाजूला विकासाचा झगमगाट दिसतो परंतु दुसऱ्या बाजूला त्याच रस्त्यांवर चालणारी वाहने ही मोठ्या प्रमाणात अपघात ग्रस्त होऊन त्याच्या जीवित हानी होत असल्याचे आता एका आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. गेल्या दोन वर्षात धोरणामुळे कोणतीही आकडेवारी स्पष्ट पण येऊ शकली नसली तरी 2020 ची आकडेवारी यासंदर्भात प्रसिद्ध झाली आणि त्यामध्ये रस्ते अपघातात भारतामध्ये एकूण १ लाख ३२ हजार लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद अधिकृतपणे समोर आली आहे. अर्थात अशा प्रकारचे अपघात केवळ अत्याधुनिक महामार्गांवर होतात असे नाही तर भारतात लिहा इतर रस्त्यांवर देखील अशा प्रकारचे अपघात हे घडतच असतात. नुसती रस्ते अपघातांची संख्या जर  मध्ये पाहिली तर ती जवळपास ३ लाख ६६ हजार  एवढी भयावह आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्यांची संख्या देखील साडेतीन लाखांच्या घरात आहे. तर एकूण मृत्यू १ लाख ३१ हजार ७१४ एवढे आहेत. कोणत्याही साथीच्या रोगापेक्षा मृत्यू ला कारणीभूत ठरणारे अपघातांचे प्रमाण भीतीदायक आहे. रस्ते अपघात होऊन त्यात मृत्युमुखी पडलेल्यांचे प्रमाण देशात सर्वाधिक उत्तर प्रदेशात असून त्याची संख्या १९ हजार १४९ एवढी आहे, तर महाराष्ट्राचा रस्ते अपघातात देशात दुसरा क्रमांक लागला आहे, जे भीतीदायक आहे. महाराष्ट्रात देखील रस्ते अपघातात २०२० वर्षात साडेअकरा हजार व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. प्रत्येक वर्षी लाखोंच्या संख्येने होणाऱ्या या अपघातांमुळे अनेकांचे आणि अनेकांच्या कुटुंबाचेही आयुष्य उद्ध्वस्त होते. अर्थात हे अपघात घडण्यासाठी कारणीभूत देखील मानवी चूकाच असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. अपघातांचे सरासरी प्रमाण राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग आणि इतर रस्ते अशा सगळ्याच प्रकारच्या रस्त्यांवर थोड्याफार फरकाने सारखेच आहे. अपघातांचे सर्वात मोठे कारण म्हणजे अमर्याद वेग. वेगवान वाहनांचा अपघात सर्वात जास्त झाल्याचे आकडेवारी सांगते. यात दुसरे कारण चुकीच्या बाजूने चालणे हेदेखील मोठे कारण आहे. अर्थात रस्त्यावर चुकीच्या साईटने चालण्यात होणारे अपघात हे पादचऱ्यांचे दिसतात. मोबाईल चा वापर वाहन चालवताना करतानाही अनेक अपघात होतात, हेही या आकडेवारीवरून स्पष्ट होते. रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू हे दुचाकी वाहन चालकांचे झाल्याचे आकडेवारी सांगते; ज्याचे प्रमाण जवळपास ४४ टक्के आहे. पादचाऱ्यांचे यात जवळपास १८ टक्के एवढे प्रमाण आहे. बैलगाडी आणि सायकल रिक्षा यांचेही प्रमाण साडेपाच टक्क्यांपेक्षा अधिक आहे. कार, टॅक्सी यांचे देखील प्रमाण भीषण म्हणावे इतके म्हणजे जवळपास १४ टक्के एवढे आहे. मोठ्या ट्रक्स चे प्रमाण साडेसात टक्के एवढे आहे. बस आणि इतर वाहनांचेही प्रमाण एकूण पाच टक्के दिसून येते. दुचाकी वाहनांचा वापर करणारे अति वेगाने वाहन चालवत असताना ५७ हजारांपेक्षा अधिक दुचाकीस्वारांचा रस्त्ते अपघातात मृत्यू झाला आहे. तर, साडेतेवीस हजार पादचाऱ्यांनाही रस्ते अपघातात जीव गमवावा लागला आहे. अपघात आणि वय यांचाही जवळचा संबंध दिसतो. २५ ते ३५ च्या वयोगटातील वाहन चालकांकडून सर्वाधिक म्हणजे २६ टक्के अपघात घडले आहेत. त्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर १८ ते २५ या वयोगटाचा क्रमांक लागतो जो २२ टक्के एवढा आहे. यात केवळ पुरूष वाहन चालकांचेच प्रमाण आहे, असेही नाही. एकूण अपघातात दहा टक्के प्रमाण हे स्त्रियांचे देखील आहे. अपघात कोणत्या वेळेला घडतात याचीही आकडेवारी असून त्यात संध्याकाळी ६ ते ९ या काळात सर्वाधिक अपघात घडतात तर रात्री १२ ते पहाटे ६ या काळात अपघातांचे प्रमाण कमी असल्याची धक्कादायक माहिती देखील या आकडेवारीवरून स्पष्ट होते.एकंदरीत, रस्ते अपघात हा खरेतर मानवी चुकांचा परिणाम आहे. अनेकांचे कुटुंब उध्वस्त करणारा हा प्रकार नियंत्रणात आणणे किंवा अतिशय कमी करणे हे माणसांच्याच हाती आहे. वाहन चालवताना शरीर आणि मन हे दोन्ही सजग ठेवले तर निश्चितच अपघातांचे प्रमाण कमी होईल!

COMMENTS