कोपरगाव प्रतिनिधी - फाळणी वेदना स्मृतिदिन हा दिवस भारताच्या संदर्भात विशेष दिवस म्हणून घोषित झाला आहे. याच दिवसाला विभाजन विभिषिका स्मृती दिवस अस
कोपरगाव प्रतिनिधी – फाळणी वेदना स्मृतिदिन हा दिवस भारताच्या संदर्भात विशेष दिवस म्हणून घोषित झाला आहे. याच दिवसाला विभाजन विभिषिका स्मृती दिवस असेही ओळखले जाते. 14 ऑगस्ट हा दिवस त्यासाठी निश्चित करण्यात आला आहे. याच दिवसाचे औचित्य साधून नगर-मनमाड हायवे लगत असणाऱ्या पुणतांबा फाट्याजवळील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी नर्सिंग कॉलेज(Rashtrasant Janardhan Swamy College of Nursing) मध्ये 13 ऑगस्ट रोजी फाळणीच्या भयपटाच्या स्मरण स्मृतिदिनाचे भव्य प्रदर्शन ठेवण्यात आले होते. हे प्रदर्शन 15 ऑगस्ट पर्यंत फार्मसी, होमिओपॅथी, आयुर्वेदा, फिजोथेरपी, या कॉलेजमधील विद्यार्थ्यांना बघण्यासाठी खुले ठेवण्यात आले होते. कार्यक्रमात नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी फाळणीचे स्मरण करून देणारे काही चित्र, रांगोळी, व आकर्षक सजावट केली. अश्या पध्दतीने नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक कार्यक्रम साजरा केला. कार्यक्रमास राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशनचे अध्यक्ष चांगदेव कातकडे, श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्ट प्रसाद कातकडे, बी.ओ.एसचे तथा चेअर पर्सन ऑफ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सचे प्रोफेसर मोहम्मद हुसेन, सेंटलूक नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या प्रोफेसर रीना जॉर्ज,यांनी अध्यक्ष म्हणून उपस्थिती दर्शवली. तसेच या कार्यक्रमा अंतर्गत राष्ट्रसंत जनार्दन स्वामी नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य इरशाद अली व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच कॉलेजचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
COMMENTS