अकोले ः भंडारदरा शेंडी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा ईयत्ता 12 वी चा निकाल 81.80% लागला असुन तिनही शाखेमध्ये कु. ऋतुराणी संजय महानोर
अकोले ः भंडारदरा शेंडी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा ईयत्ता 12 वी चा निकाल 81.80% लागला असुन तिनही शाखेमध्ये कु. ऋतुराणी संजय महानोर या विद्यार्थीनीने प्रथम क्रंमाक पटकावला आहे. 12 वी परीक्षेचा ऑनलाईन निकाल मगळवारी जाहीर झाला असुन शेंडीच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. विद्यालयाची ऋतुराणी संजय महानोर या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थीनीने कला वाणिज्य व विज्ञान या तीनही शाखेत विद्यालयात प्रथम येत 76.50 टक्के गुण मिळविले. या विद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल 93.44 टक्के निकाल लागला असुन श्रद्धा काशिनाथ गभाले ही विद्यार्थीनी 64.17 टक्के गुण मिळवत प्रथम तर संध्या मारुती लोटे द्वितीय ( 56 टक्के) व विनोद लक्ष्मण मुठे हा 55.17 टक्के गुण मिळवत तिसरा आला वाणिज्य विभागात ऋतुराणी संजय महानोर प्रथम (76.50), विमल भाऊ गांगड द्वितीय (73.17) अर्चना किसन खोले तृतीय (56.17) यांनी टक्के मिळविले आहे. वाणिज्य विभागाचा एकुण निकाल 73.07 लागला . कला शाखेमध्ये निर्मला पांडुरंग पोकळे (61.18 टक्के) प्रथम, म्हाळसा विष्णु लोटे (60 टक्के) द्वितीय, समाधान चंद्रकात सोनवणे (58.67 टक्के) मार्क्स मिळवत तिसरा आला आदिवासी भागातविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविल्याबद्दल प्राचार्य दिलीप रोंगटे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
COMMENTS