Homeताज्या बातम्यामनोरंजन

रितेश-जिनिलिया थिरकले ‘दिल में बजी गिटार’ गाण्यावर

मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूडमधील सर्वात क्यूट कपलपैकी एक कपल म्हणजे रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसुझा-देशमुख . ते दोघेही कायम चाहत्यांना कपल गोल्

निर्बंध घालून महाबळेश्‍वरसह पाचगणी परिसर पर्यटकांसाठी खुला
आता डोक्यावरचे कर्ज कसे फेडणार; अतिक्रमणात व्यवसाय झाला थंडगार
अधिवेशनाचे सत्र असंवैधानिक ; राज्यघटनेच्या चिंधड्या | LokNews24

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूडमधील सर्वात क्यूट कपलपैकी एक कपल म्हणजे रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसुझा-देशमुख . ते दोघेही कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. ते दोघे सोशल मीडियावर सक्रीय असतात आणि एकमेकांसोबतचे मजेशीर रिल्स शेअर करत असतात. त्यामुळे ते बऱ्याचदा चर्चेत येत असतात. दरम्यान आता त्यांनी श्रीदेवी प्रसन्न या मराठी चित्रपटातील ‘दिल में बजी गिटार’ गाण्यावर डान्स केला आहे. त्यांच्या या डान्सला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. रितेश देशमुखने जिनिलियासोबत ‘दिल में बजी गिटार’ गाण्यावर डान्स केला आहे आणि तो व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्या गाण्यावर थिरकताना वेड चित्रपटातील मला वेड लावलंय या गाण्यातील स्टेप करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत रितेशने लिहिले की, हृदयात गिटार वाजू लागलं (दिल में बजी गिटार) की नाचावं लागेल.

कुमार तौरानी, गिरीश कुमार तौरानी आणि टीप्स निर्मित श्रीदेवी प्रसन्न चित्रपटातील दिल में बजी गिटार मराठी व्हर्जनही तितकंच रॉकिंग आहे. सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकरसह संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप शुभेच्छा. चाहत्यांच्या प्रतिक्रिया.. रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखचे चाहते त्यांच्या व्हिडीओंची उत्सुकतेने वाट पाहत असतात. त्यामुळे त्यांच्या दिल में बजी गिटार गाण्याच्या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. एका चाहत्याने लिहिले की, मज्जा आ गया.. खूब सुंदर. कोरिओग्राफर फराह खानने लिहिले की, तुम्हाला कोणाच्या कंपनीची गरज नाही. दुसऱ्या युजरने म्हटले की, नवीन व्हर्जनमधील या गाण्यावर मी तुम्हाला मिस करत होतो आणि या रिलची खरंच गरज होती. आणखी एकाने लिहिले की, एक नंबर कपल. जगात भारी जोडी. ‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपटाबद्दल.. श्रीदेवी प्रसन्न चित्रपटाच्या निमित्ताने सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात लग्नासाठी योग्य जोडीदाराच्या शोधात असलेल्या श्रीदेवी प्रसन्न या दोघांची गोष्ट प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. हा चित्रपट २ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

COMMENTS