लोणी : लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष
लोणी : लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदामंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्रात मार्गदर्शन घेतलेल्या संगमनेरचा विद्यार्थी ऋषिकेश घुगे याची इंडियन टेरिटोरियल आर्मी मध्ये निवड झाली आहे.
ऋषिकेश घुगे संगमनेर तालुक्यातील खळी ( कांगणवाडी) या गावचा असून घरची परिस्थिती बेताची असताना प्रामाणिक कष्ट आणि प्रवरा स्पर्धा केंद्रातून लाभलेले मार्गदर्शन यामुळे त्याला उज्वल यश प्राप्त करता आले. त्याचे अकरावी बारावीचे शिक्षण प्रवरेच्या आश्वी महाविद्यालयातून झाले आहे तसेच तो सध्या कला विज्ञान संगणक व वाणिज्य महाविद्यालय आश्वी या ठिकाणाहून बी.एस्सी चे शिक्षण पूर्ण करीत आहे. संस्थेच्या माध्यमातून मंत्री विखे पाटील यांच्या संकल्पनेतून विविध शाळा महाविद्यालयामध्ये प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती ,आर्मी भरती त्याचबरोबर विविध भरती प्रशिक्षणाबाबत योग्य ती माहिती देऊन तज्ञांचे मार्गदर्शन, संवाद कौशल्य, मुलाखत तंत्र त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची तयारी करून घेतली जाते. असे स्पर्धा परीक्षेचे समन्वयक डॉक्टर शैलेश देशमुख कवडे यांनी सांगितले. या यशाबद्दल जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील, माजी खा.डाॅ.सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुश्मिता विखे पाटील, संस्थेचे सहसचिव भारत घोगरे पाटील, संस्थेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद हिरेमठ, संस्थेचे शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, आश्वी कॉलेजचे कॅम्पस संचालक डाॅ. महेश खर्डे, पद्मश्री विखे पाटील कॉलेजचे कॅम्पेस डाॅ.आर. ए. पवार, कोल्हार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिभाऊ आहेर प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्राचे समन्वयक डॉ. शैलेश कवडे-देशमुख आणि क्रीडा प्रशिक्षक शिवाजी बुचडे यांनी अभिनंदन केले आहे.
COMMENTS