Homeताज्या बातम्याक्रीडा

रिषभ पंतचे टीमला सरप्राईज 

भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत याला 2022 च्या अखेरीस भीषण अपघात झाला होता. या आपघातात तो गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, शस्त्रक्रिया झाल्यानंतर रिषभ

श्वास घेण्यास त्रास… तरीही क्रिकेट खेळायला उतरला 83 वर्षांचा हा खेळाडू
मिस इंडिया रायझिंग स्टार 2023 अ‍ॅट ताज किताबने सातारची कु. स्नेहल चांगण सन्मानीत
रिझर्व्ह बँकेकडून तारणमुक्त कृषी कर्ज रकमेत वाढ

भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत याला 2022 च्या अखेरीस भीषण अपघात झाला होता. या आपघातात तो गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, शस्त्रक्रिया झाल्यानंतर रिषभ पंत सध्या दुखापतीतून सावरत आहे. मात्र पूर्णपणे तंदुरुस्त होईपर्यंत क्रिकेटच्या मैदानावरील त्याचं पुनरागमन कठीण आहे. दरम्यान, आता स्वत: रिषभ पंतनेच त्याच्या संघातील पुनरागमनाबाबत मोठी अपडेट दिली आहे. रिषभ पंतचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये तो दिल्ली कॅपिटल्सच्या संघासोबत बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये दिसत आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ पुढच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी भिडणार आहे. रिषभ पंतने त्याच्या पुनरागमनाबाबत फार काही सांगितलेले नाही. मात्र त्याच्या आरोग्याबाबत त्याने महत्त्वाची अपडेट दिली आहे. त्याने सांगितलं की, मी योग्य पद्धतीने रिकव्हर करत आहे. तसेच दिवसागणिक माझी प्रकृती सुधारत आहे. दरम्यान, यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला रिषभ पंतची उणीव प्रकर्षाने भासत आहे. मी येथे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आलो होतो. दिल्ली कॅपिटल्सचा संघही इथेच असल्याने मी त्यांना भेटलो. मी खेळाडूंना सराव करताना पाहिलं. मला चुकल्या चुकल्यासारखं वाटलं. मात्र माझं मन संघासोबत आहे. पुढच्या सामन्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. या आधी गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यावेळीही संघाला प्रोत्साहन देण्यासाठी रिषभ पंत मैदानात आला होता

COMMENTS