Homeताज्या बातम्याक्रीडा

रिचर्ड कॅटबरोची उपस्थिती भारतासाठी अपशकुनी ठरतेय 

क्रिकेट समिक्षक.

             टिम इंडियाच्या अनपेक्षित पराभवाने व ऑस्ट्रेलियाच्या विक्रमी सहाव्या विजेतेपदाने तेरावी विश्वचषक क

रिंकू सिंहच्या शॉटने खळ्ळ खट्याक प्रचंड ताकदीनं मारलेल्या सिक्सने फोडली काच
आंतरराष्ट्रीय पॅरा टेबल टेनिस स्पर्धेत पृथ्वी बर्वेचा डबल धमाका
भारताचा क्रिकेटपटू शिखर धवनकडून निवृत्ती जाहीर

             टिम इंडियाच्या अनपेक्षित पराभवाने व ऑस्ट्रेलियाच्या विक्रमी सहाव्या विजेतेपदाने तेरावी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत अनेक विक्रम – पराक्रम घडले. टाईम आऊट सारखा विवादास्पद निर्णयही आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच बघायला मिळाला. तर मॅच फिक्सिंग, नाणेफेकीचा विवाद, खेळपट्टयांबद्दल चुकीचे गैरसमज, भारतीय गोलंदाजांना आयसीसी विशिष्ट चेंडू देणे, फ्लड लाईटस विषयी गैरसमज पसरविणे, जादूटोणा करणे यासारखे आरोप यजमान बीसीसीआय व आयसीसीवर भारताच्या शेजारी देशातील अडगळीत पडलेल्या स्वयंघोषित माजी विद्वान खेळाडूंनी केले. पुढे जात ते सगळे आरोप बिनबुडाचे ठरले व हे विद्वान मंडळी तोंडावर आदळले. त्यानंतर त्यांच्याच देशात त्यांच्यावर तोंड लपाविण्याची वेळ आली.

               या स्पर्धेत भारताने उपांत्य फेरीपर्यंतचे दहा सलग सामने जिंकून अप्रतिम कामगिरी केली. मात्र अंतिम सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र या पराभवानंतर अंधश्रध्दा म्हणा किंवा योगायोग एका अजब घटनेची चर्चा रंगात आली. ती म्हणजे इंग्लिश पंच रिचर्ड कॅटलबरो यांच्या आयसीसी स्पर्धांतील नॉकआऊट सामन्यातील नियुक्तीची व भारताच्या पराभवांची. इथे विषय जरा वेगळा आहे. त्याचं असं की, रिचर्ड कॅटलबरो भारत खेळत असलेल्या कोणत्याही प्रारूपांतील आयसीसी स्पर्धांच्या नॉकआऊट सामन्यात जेंव्हा पंच म्हणून उभे राहातात तेंव्हा भारताचा हमखास पराभव होतो व हि श्रृंखला आता वाढतच चालली असून भारतीय क्रिकेटरसिकांच्या दृष्टीने रिचर्ड कॅटलबरो हे भारतासाठी अपशकुनी ठरत असून त्यांच्या पंचगिरी करण्यामुळेच भारताची विजयाची घडी बिघडते व भारत शंभर टक्के पराभूत होतोच. रिचर्ड कॅटलबरो यांच्या उपस्थितीमुळेच भारत हारतो हा गैरसमज आहे की, अंधश्रध्दा का निव्वळ योगायोग का द्वेषभाव ? हा एक संशोधनाचा विषय बनला असून भविष्यात रिचर्ड कॅटलबरो यांच्या उपस्थितीत आयसीसीच्या स्पर्धेत नॉक आऊट सामन्यात भारताचा पराभव झाला तर कदाचित ते पंच कॅटलबरो यांच्या जिवीतास धोकादायकही ठरू शकते. तसे पहाल तर भारतात या घटनेला अंधश्रध्देच्या भावनेतून बघितले जात असले तरी परदेशी लोक याकडे योगायोग म्हणूनच बघतात. तरी आयसीसीने भविष्यात नॉकआऊट सामन्यात कॅटलबरो यांना कामगिरी देऊ नये. मात्र आयसीसी असे काही करेल असं वाटत नाही.

               विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा अनपेक्षित पराभव झाल्यानंतर या चर्चेला मोठे उधाण आले. वास्तविक या सामन्यात कॅटलबरो याची पंचगिरी अतिशय निकृष्ठ दर्जाची झाली. भारताच्या फलंदाजीवेळी त्यांनी काही वादग्रस्त निर्णय दिले.  त्यामुळे भारताच्या कमी धावा झाल्या व परिणामतः संघाला पराभवाची नामुष्की पत्करावी लागली.

               भारताच्या या पराभवानंतर पंच कॅटलबरो जास्त चर्चेत आले. सोशल मिडीयावर त्यांची मोठी हेटाळणी (ट्रोल) करण्यात आले. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजी प्रसंगी कॅटलबरो यांनी मार्नस लाबुशेन विरूध्दचे पायचितचे जोरदार अपिल फेटाळले. भारताने रिव्ह्यू घेतला. त्यामध्ये तो अंपायर कॉल निघाला. त्याक्षणी लाबुशेनला कॅटलबरोने बाद दिले असते तर सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता, कारण त्याच लाबुशेनने ट्रेव्हिस हेड सोबत मोठी भागिदारी केली व स्वतः विजय मिळवूनच नाबाद परतला. त्यामुळे भारतीय क्रिकेट रसिकांमध्ये कॅटलबरो विषयी तीव्र संताप निर्माण झाला आहे. भविष्यात त्याचे उद्रेकात रूपांतर न झाले तर बरे होईल.

रिचर्ड कॅटलबरो आयसीसीच्या ज्या ज्या निर्णायक सामन्यात भारताविरूद्ध पंच म्हणून उपस्थित राहिले आहेत, त्या त्या वेळी भारताचा पराभव झाला आहे. सन २०१४ पासून ते २०२३ च्या वनडे वर्ल्ड कपपर्यंत झालेल्या स्पर्धांमधील जवळपास सर्वच नॉकआउट सामन्यांमध्ये रिचर्ड किटलबरो मैदानावरील पंच राहिले आहेत. पंच रिचर्ड कॅटलबरोमुळेच भारताने सन २०१४ ची वनडे वर्ल्ड कप फायनल, सन २०१५ ची वर्ल्ड कप सेमी फायनल, सन २०१६ ची टी ट्वेंटी वर्ल्ड कप सेमीफायनल, सन २०१७ ची चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल आणि सन २०१९ ची वनडे वर्ल्ड कप सेमीफायनल, सन २०२१ वर्ल्ड टेस्ट चँपीयनशीपच्या अंतिम सामन्यात टिव्ही पंच, सन २०२३ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपध्ये आणि आता सन २०२३ चा वनडे वर्ल्ड कप देखील गमावला आहे. या सर्व सामन्यात कॅटलबरो यांची कामगिरी भारतासाठी निराशजनक ठरल्याने भारताचे आयसीसीचे जवळजवळ आठ विजेतेपदे निसटले आहेत. तरी वरील पंचाची भारताविरूद्धच नव्हे तर इतर देशांच्या सामन्यात नियुक्ती पूर्वी त्यांना आणखी कठोर प्रशिक्षण देऊन चांगल्या पैकी तयार करण्याची जबाबदारी आयसीसीची आहे. यामुळे भारतीय खेळाडूंच्या मेहनतीवर पाणी फेरले गेलेच शिवाय संघाचीही पिछेहाट झाली आहे. तेंव्हा किमान भारताविरूध्द तरी असे वर्णद्वेषी व पाताळयंत्री पंच निवडू नये. त्यामुळे भारताचे नुकसान होईलच परंतु सदर पंचाच्या जीवावरही बेतू शकते.

लेखक – डॉ.दत्ता विघावे क्रिकेट समिक्षक. 

COMMENTS