Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रामाणिक मिळकत धारकांची बक्षीसे कागदावरच

पुणे : मिळकतकर भरण्यास मिळकतधारकांना प्रोत्साहित करण्यासाठी महापालिकेने एक कोटी रुपयांची विविध बक्षीसे देण्याचे जाहीर केले होते. मात्र, ही एक कोट

सभामंडपावर झाड कोसळून ७ भाविक ठार ; ५ गंभीर, ४० जखमी
वडिलांचा 13 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
नोटबंदीबाबत आम्ही मूक दर्शक बनू शकत नाही सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले

पुणे : मिळकतकर भरण्यास मिळकतधारकांना प्रोत्साहित करण्यासाठी महापालिकेने एक कोटी रुपयांची विविध बक्षीसे देण्याचे जाहीर केले होते. मात्र, ही एक कोटी रुपयांची बक्षिसे कागदावरच राहिली आहेत. बक्षिसापोटीच्या वस्तूंची खरेदी न झाल्याने बक्षिसांचे वितरण करण्यात आलेले नाही. दरम्यान, दसर्‍यापर्यंत वस्तूंचे वितरण करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
चालू आर्थिक वर्षातील मिळकतकर भरण्यासाठी महापालिकेने मिळकतकर लॉटरी योजना जाहीर केली होती. त्यामध्ये पेट्रोल कार, ई-बाईक, मोबाईल संच आणि लॅपटॉप अशा वस्तूंचा समावेश होता. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली होती. वार्षिक कर 25 हजार रुपयांपेक्षा कमी कर असलेल्या दोघांना प्रत्येकी एक-एक तर 25 हजारांपेक्षा जास्त पण 50 हजारांपेक्षा कमी असणार्‍या एका मिळकतधारकाला एक पेट्रोल कार जाहीर करण्यात आली होती. याच प्रकारातील सहा मिळकतधारकांना सहा ई-बाईक तर 25 ते 50 हजार रुपयांपर्यंत कर भरणार्‍या तिघांना अशा एकूण नऊ ई-बाईक देण्यात आल्या. तसेच 25 हजारांपर्यंत कर भरणार्‍या सहा मिळकतधारकांना सहा मोबाईल संच तर 25 ते 50 हजारांपर्यंत कर भरणार्‍या तीन मिळकतधारकांना मोबाईल संच देण्यात आला. एकूण पाच मिळकतधारकांना पेट्रोल कार, पंधरा मिळकतधारकांना ई-बाईक, पंधरा मिळकतधारकांना मोबाईल संच, दहा मिळकतधारकांना लॅपटॉप देण्याचे जाहीर करण्यात आले होते. लॉटरीनंतरही बक्षिसे देण्यात न आल्याने महापालिकेवर टीका करण्यात आली होती. मात्र, बक्षिसांच्या गाड्या आणि अन्य वस्तूंची खरेदी झाली नसल्याने गणेशोत्सवात बक्षिसे दिली जातील, असे महापालिकेकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, गणेशोत्सवानंतरही विजेत्यांना बक्षिसाच्या रकमेची प्रतीक्षा मिळाली नसल्याचे समोर आले आहे.

COMMENTS