Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रामराव पाटील माध्यमिक विद्यालयात क्रांती दिन साजरा

बीड प्रतिनिधी - रामराव पाटील माध्यमिक विद्यालय केज येथे 9 ऑगस्ट 23 रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. क्रांती दिनाचे औचित्य साधून चित्र

मराठमोळा अभिनेता दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर
देशभरात कोरोनाचे 305 नवे रूग्ण
कृषी विकास अधिकारी शंकर किरवे यांच्या संपत्तीची चौकशी करून कारवाई करा

बीड प्रतिनिधी – रामराव पाटील माध्यमिक विद्यालय केज येथे 9 ऑगस्ट 23 रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. क्रांती दिनाचे औचित्य साधून चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन केले गेले यावेळी केजचे तहसीलदार मा. अभिजीत जगताप साहेब व गटशिक्षणाधिकारी श्री. कमलाकर खरात साहेब तसेच तालुका समन्वयक  सुनील कांबळे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक  सोनवणे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री गोरे सर यांनी केले. माननीय तहसीलदार  अभिजीत जगताप यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे महत्त्व व अमृतमहोत्सवी वर्षा च्या विविध उपक्रमा बद्दल सखोल पणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व मुलांच्या सहभागाबद्दल,शिस्तीबद्दल शाळेचे कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती गिरी मॅडम यांनी केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच माझी माती माझा देश या उपक्रमाबद्दल विद्यार्थी व शिक्षकांना पंचप्रण शपथ देण्यात आली.

COMMENTS