Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शाहू महाराजांमुळे संभाजीराजे छत्रपती यांची माघार

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा निवडणूक चांगलीच रंगतदार होण्याची शक्यता आहे. या जागेवर महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज निवडणूक लढणार असल्याचे

सांगलीमध्ये पावसाची हजेरी
अखेर एकनाथ खडसे स्वगृही परतण्याचे संकेत !
पिढ्यान्पिढ्या अतिक्रमित मौजे गंगापूरच्या गंगादेवी मंदीर रस्त्याने घेतला मोकळा श्वास

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा निवडणूक चांगलीच रंगतदार होण्याची शक्यता आहे. या जागेवर महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाकरे गटाने शाहू महाराजांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवावी असे आवाहन केले होते, तर दुसरीकडे काँगे्रसने आधीपासूनच शाहू महाराजांना आपल्या पक्षाकडून लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे शाहू महाराज काँगे्रसकडून मैदानात उतरण्याची शक्यता आहे. मात्र त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांनी माघार घेतली आहे.
माध्यमांशी बोलतांना बुधवारी संभाजीराजे म्हणाले की, आगामी काळातील लोकसभा निवडणूक लढवायची माझी इच्छा होती. त्यासाठी कोल्हापूर किंवा नाशिकचा विचार होता. मात्र माझे बाबा शाहू महाराज छत्रपती यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे आता मी निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रश्‍नच उद्भवत नसल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. मी निवडणुकीला उभे राहिलो असतो तर मी 100 टक्के विजयी होण्यासाठी प्रयत्न केले असते. मात्र, आता महाराज उभे राहत असल्याने मी 1000 टक्के प्रयत्न करणार असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. आम्हाला कोल्हापूरची निवडणूक महत्त्वाची आहे. एकदा महाराजांचा निर्णय अंतिम झाला की, दुसरा कोणताच विषय डोळ्यासमोर नसेल. यानंतर डोळ्यासमोर एकच लक्ष असेल, ते म्हणजे कोल्हापूरची निवडणूक, असेही संभाजीराजे यांनी म्हटले आहे. त्यामुळे या आधी होत असलेल्या सर्व चर्चांवर त्यांनी पडदा टाकला आहे. शाहू महाराज विजयी होतील, याचा आम्हाला विश्‍वास आहे. मात्र गाफील राहून चालणार नाही. त्या पद्धतीने आमचे प्रयत्न असतील, असे देखील संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. शाहू महाराज छत्रपती यांची इच्छा पूर्ण करणे ही आमची जबाबदारी आहे. त्यांनी निवडणुकीला उभे राहावे ही लोकांचे देखील इच्छा आहे. आणि त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. आमचे वडील अधिपती आहेत. हे नुसते बोलून चालणार नाही. तर ते करून दाखवावे लागणार असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

COMMENTS