Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवळाली प्रवरातील इंग्लिश स्कूलचा निकाल शंभर टक्के

देवळाली प्रवरा ः देवळाली प्रवरा येथील न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयाचा एस.एस.सी बोर्ड परीक्षेचा निकाल 100 टक्के  लागला असून विद्यार्थ्यांनी याही वर्

तर आमदार,खासदार,मंत्री यांची खैर नाही ः सावंत
प्रभागातील विकास कामांचा लेखा-जोखा जनतेसमोर मांडणे नगरसेवकांचे आद्य कर्तव्य – आ.संग्राम जगताप
शब्दगंध परिषदेचे ऑक्टोबरमध्ये साहित्य संमेलन

देवळाली प्रवरा ः देवळाली प्रवरा येथील न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयाचा एस.एस.सी बोर्ड परीक्षेचा निकाल 100 टक्के  लागला असून विद्यार्थ्यांनी याही वर्षी विद्यालयाच्या उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. विद्यालयातील समृद्धी रवींद्र सालबंदे या विद्यार्थिनीने 94 टक्के  गुण मिळून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच धनश्री सोमनाथ गाडे या विद्यार्थिनीने 93 टक्के मिळून विद्यालयात द्वितीय क्रमांक मिळविला आहे.  तनुश्री अमोल धोंडे या विद्यार्थिनीने 92 टक्के  मिळवून विद्यालयात तृतीय क्रमांक मिळविला आहे. उदय भास्कर  गल्हे या विद्यार्थ्याने 91 टक्के मिळवून विद्यालयात चतुर्थ क्रमांक मिळविला आहे.  तस्मिया इमरान सय्यद या विद्यार्थिनीने 90.6 टक्के मिळून पाचवा क्रमांक मिळविला आहे. समृद्धी रवींद्र सालबंदे या विद्यार्थिनीने गणित, विज्ञान व समाजशास्त्र या विषयात 96 गुण मिळविले आहे.धनश्री सोमनाथ गाडे या विद्यार्थिनीने समाजशास्त्र या विषयात 97 गुण मिळविले आहे. तसेच तनुश्री अमोल धोंडे व उदय भास्कर गल्हे या विद्यार्थ्यांनी सायन्स या विषयात 97 गुण मिळविले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्षा डॉ. गीता राऊत, सचिव प्रा. सतीश राऊत, संचालक मच्छिंद्र पाटील तांबे, प्राचार्य दादासाहेब भोसले, सुधाकर पाटील कराळे, रफिक शेख तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS