v नवी दिल्ली : आगामी 18 जुलैपासून सुरू होणार्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी लोकसभा सचिवालयाने असंसदीय शब्दांची यादी जारी केली आहे. त्यानुसार
v
नवी दिल्ली : आगामी 18 जुलैपासून सुरू होणार्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी लोकसभा सचिवालयाने असंसदीय शब्दांची यादी जारी केली आहे. त्यानुसार राज्यसभा आणि लोकसभेत असंसदीय शब्दांच्या वापरावर निर्बंध असणार आहे. या निर्णयाला विरोधी पक्षांनी आक्षेप नोंदवला आहे.
यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या शब्दांच्या यादीनुसार संसदेच्या दोन्ही सभागृहात यापुढे गद्दार, शकुनी, जयचंद, भ्रष्ट, यासह जुमलाजीवी, कोरोना स्प्रेडर, बाल बुद्धी, स्नूपगेट, शर्म, दुर्व्यवहार, विश्वासघात, ड्रामा, पाखंड, अक्षम, शकुनी, जयचंद, लॉलीपॉप, चांडाल चौकडी, गुल खिलाए, पिट्ठू , कमीना, काला सत्र, दलाल, खून की खेती, दोहरा चरित्र, निकम्मा, नौटंकी, ढिंढोरा पीटना, बहरी सरकार, चिलम लेना, छोकरा, कोयला चोर, गोरू चोर, चरस पीते हैं, सांड, खालिस्तानी, विनाश पुरुष, तानाशाही, तानाशाह, अराजकतावादी, गद्दार, अपमान, गिरगिट, गूंस, घड़ियाली आंसू, असत्य, अहंकार, काला दिन, काला बाजारी, खरीद फरोख्त, दंगा, दलाल, दादागीरी, बेचारा, संवेदनहीन, सेक्सुअल हरेसमेंट हे हिंदी शब्द हटवण्यात आले आहेत. लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती तसेच पीठासीन अधिकार्यांना उद्देशून काही शब्दांना आणि वाक्यांवर देखील निर्बंध घालण्यात आले आहेत. यात ’आपण माझा वेळ वाया घालवत आहात’, ’तुम्ही आमचा गळा दाबून टाका’, ’खुर्चीला कमजोर केले आहे’, ’ही खुर्ची सदस्यांचे संरक्षण करु शकत नाही’ अशा वाक्यांचा समावेश आहे. काही इंग्रजी शब्दांवर देखील निर्बंध आणण्यात आले आहेत. यात आय विल कर्स यू, बिटेन विद शू, बिट्रेड, ब्लडशेड, चिटेड, शेडिंग क्रोकोडाइल टियर्स, डंकी, गून्स, माफिया, रबिश, स्नेक चार्मर, टाउट, ट्रेटर, विच डाक्टर, डिसग्रेस, ड्रामा, आईवॉश, मिसलीड, लाय, अनट्रू असे शब्द समावेशित आहेत.लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजाच्या प्रक्रियेत जर अध्यक्षांना एखादा शब्द अपमानजनक किंवा असंसदीय वाटला तर तो शब्द हटवण्यासाठी ते आदेश देतात. तर नियम 381 नुसार सभागृहाच्या कार्यवाहीचा एखादा भाग हटवायचा असेल तर तो अध्यक्षांच्या आदेशाने हटवण्यात येतो.
COMMENTS