नगर-शिर्डी महामार्गासाठी नवीन निविदा काढून रस्त्याचा प्रश्‍न सोडवा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर-शिर्डी महामार्गासाठी नवीन निविदा काढून रस्त्याचा प्रश्‍न सोडवा

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींकडे डॉ. राजेंद्र पिपाडा यांची मागणी

राहाता/प्रतिनिधी : नगर-शिर्डी महामार्गांचे अर्धवट रस्ते खोदुन ठेवल्यामुळे एकेरी वाहतूक चालु असुन या खोदलेल्या रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणावर अपघाताचे

परकीय आक्रमणे रोखण्यासाठी सज्ज रहावे ः गोविंद जाटदेवळेकर
LokNews24 l महंत लक्ष्मण महाराज रामगडकर यांच्या निधनाने वारकरी संप्रदाय पोरका
जामखेड पोलिसांनी केली 48 हजाराची अवैध दारु जप्त

राहाता/प्रतिनिधी : नगर-शिर्डी महामार्गांचे अर्धवट रस्ते खोदुन ठेवल्यामुळे एकेरी वाहतूक चालु असुन या खोदलेल्या रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणावर अपघाताचे प्रमाण वाढले असुन तात्काळ अर्धवट खोदलेले रस्ते बुजवावेत व ठेकेदार काम करत नसल्याने नवीन निविदा प्रकिया करुन या रस्त्याचे काम पुर्ण करावे अशी मागणी डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे शिर्डी विमानतळ येथे प्रत्यक्ष भेट घेवुन निवेदनाद्वारे केली. यावेळी शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे उपस्थित होते.
यावेळी नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेवुन त्यांच्याशी नगर-शिर्डी महामार्गाच्या कामाविषयी चर्चा केली यावेळी त्यांनी संबंधित ठेकेदाराला टर्मिनेट करु व इतर कामांबाबत अधिका-यांना सुचना देवु असे, यावेळी चर्चेदरम्यान त्यांनी सांगितले. दिलेल्या निवेदनात डॉ.राजेंद्र पिपाडा म्हणाले की नगर-शिर्डी रस्त्याची गेल्या 20 वर्षापासुन रखडलेले काम कंत्राटदाराने सुरु करुन लगेचच अर्धवट अवस्थेत सोडलेले असुन सध्या गेल्या 2 महिन्यापासुन काम बंद आहे. त्यामुळे उत्तर दक्षिण भारतातुन शिर्डीत येणा-या भाविकांना व सामान्य जनतेला मनस्ताप सहन करावा लागत आहे. जागोजागी रस्ते अर्धवट खोदुन ठेवल्याने मोठ्या प्रमाणावर अपघात होत असुन खोदलेले रस्ते तात्काळ बुजवले नाही तर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर अपघात होवुन निरपराध लोकांचे बळी जाणार असल्याची शक्यता आहे. रस्ते खोदुन ठेवल्याने एकेरी वाहतूक सुरु आहे. रस्त्याच्या बाजुला बांघकाम साहित्य आहे यामुळे 2-3 तास एकाच ठिकाणी वाहतूक ठप्प होवुन जनतेला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सामान्य जनतेच्या मनात संतापाची तीव्र भावना आहे. या अर्धवट खोदलेल्या रस्त्यात पावसाच्या पाण्याने खड्डे भरुन वाहनधारकाच्या लक्षात न आल्याने मोठ्या प्रमाणावर अपघात होणार असुन खोदलेले रस्ते तात्काळ बुजवुन वाहतूकीस सुरळीत होण्यासाठी आपण तात्काळ संबंधितांना सुचना कऱण्याची गरज आहे. अर्धवट कामामुळे रस्त्याची अत्यंत भिषण अवस्था झालेली असुन वाहन चालवणे अवघड झाले आहे हा रस्ता नसुन जणु मृत्युचा सापळाच बनला आहे. या रस्त्यावर प्रवास करताना प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नगर ते कोपरगाव मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. सर्वाधिक अवजड वाहनांची वर्दळ असणार्‍या या महामार्गावर लहान मोठी वाहने दुचाकी स्वारांना अक्षरश: जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. केवळ खड्ड्यांमळे फार लोकांचे प्राण या रस्त्यावर गेले आहेत. कोपरगाव नगर जिल्ह्यातील सर्वाधिक वाहतुक असलेला नगर-मनमाड हा एकमेव महामार्ग आहे. रस्ता जागोजागी फुटलेला आहे. वाहने आदळुन किंवा खड्डे चुकविताना अपघात प्रवाशांचे हाडे खिळखिळी होत आहेत. खराब रस्त्यांमुळे वाहने नादुरुस्त होवुन वाहतूकीचा खोळंबा होतो. ठेकेदाराने सदर रस्त्याची काम करणार नाही असे पत्र दिले असल्याचे समजते. असे असल्यास तात्काळ नव्याने निविदा प्रक्रिया करुन या रस्त्याचे काम लवकर पुर्ण करुन 20 वर्षापासुन होणारा सर्व सामान्य जनतेला, भाविकांना, चालकांना,वाहनधारकांचा त्रास कमी करावा अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली.

COMMENTS