Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहात्यातील पथदिवे बंदमुळे नागरिकांना मनस्ताप

शिर्डी/प्रतिनिधी ः राहाता शहरातील पथदिवे बंद अवस्थेत असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप होत आहेत. राहाता नगरपरिषदेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. का

खडकी आगीच्या दुर्घटनेतील कुटुंबीयांना मदत मिळवून द्या
BREAKING: नाशिकच्या डॉ. जाकीर हुसेन मनपा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन गळती २२ रुग्ण दगावले | Lok News24
मळगंगादेवीच्या पालखी मिरवणूकीचे जल्लोषात स्वागत

शिर्डी/प्रतिनिधी ः राहाता शहरातील पथदिवे बंद अवस्थेत असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप होत आहेत. राहाता नगरपरिषदेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. काही पथदिव्यांच्या पोलवरील दोन दिवे आहेत, त्यापैकी काही ठिकाणी एकच चालु आहे, तर दुसरा बंद अवस्थेत आहेत.
या पोलवरील दिव्याबद्दल नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांना वेळो-वेळी तोंडी किंवा फोनव्दारे नागरिकांनी सांगितले असता आधिकारी आज करु उद्या करु अशी उडवाउडविचे उत्तरे देउन वेळ काढू पणा करत आहे. दरम्यान शहरांमध्ये काही दिवसांपूर्वी जोरदार वार्‍यासह पावसाने हजेरी लावली होती. व या जोराच्या वार्‍याने शहरातील काही विद्युत पोलवरील दिवे व पथदिवे हे नादुरुस्त झाले होते तर काही विद्युत पोल वरील विद्युत प्रवाह सुरळीत होता बंद पडलेले विद्युत प्रवाह राहाता नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांनी दुरुस्त करून विद्युत पोल वरील पथदिवे सुरळीत केले मात्र काही ठिकाणी अजूनही नादुरुस्त असल्याने संबधित कर्मचारी यांनी पाहणी करून करुन बंद पडलेले पथदिवे सुरळीत करण्याची मागणी राहात्यातील नागरिकांकडुन होत आहे.

COMMENTS