Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निवासी डॉक्टरांची राज्यव्यापी संपाची हाक

7 फेबु्रवारीपासून संपाचा जाणार असल्याचा इशारा

छ.संभाजीनगर ः राज्यातील निवासी डॉक्टरांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा राज्यव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे.अनेकदा पाठपुरवठा करून द

स्वत:चे नाव लावयची लाज वाटणारा कसला प्रेरणास्त्रोत : आ. भाई जगताप
Aurangabad : मध्यवर्ती संघटनेचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने (Video)
औरंगाबादमध्ये कुख्यात गुंडाची हत्या, साडूकडून साडूचा ‘गेम’! l पहा LokNews24

छ.संभाजीनगर ः राज्यातील निवासी डॉक्टरांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा राज्यव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे.अनेकदा पाठपुरवठा करून देखील सरकार आश्‍वासनांच्या पलीकडे कोणतेही कार्यवाही करत नसल्याने राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी संपावर जाण्याची भूमिका घेतली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील निवासी डॉक्टर देखील या संपात सहभागी होणार असून, याबाबत त्यांच्याकडून अधिकृत पत्रक देखील काढण्यात आले आहे.
निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन हे प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे. निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा प्रमाणात हॉस्टेलची व्यवस्था करण्यात यावी. निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन ही केंद्रीय संस्थांमध्ये दिल्या जाणार्‍या विद्यावेतनाप्रमाणे देण्यात यावे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील निवासी डॉक्टरांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. गेल्या एक वर्षभरात मध्यवर्ती मार्ड संघटनेने अनेकवेळा यासाठी सरकारकडे पाठपुरवठा केला. पण प्रत्येकवेळी आश्‍वासनांचे गाजर हे प्रशासनाकडून दाखवण्यात आले. प्रत्यक्षात कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. विविध प्रलंबित मागण्यासाठी मध्यवर्ती मार्ड संघटनेने 7 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजेपासून संपावर जाण्याचा इशारा दिलेला आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर येथील सर्व निवासी डॉक्टर हे संपाची भूमिका घेतील. संपामुळे होणार्‍या रुग्णसेवेवरील परिणामासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, आणि संपाच्या काळात सर्व अत्यावश्यकसेवा चालू ठेवण्यात येतील, असे निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. यावेळी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निवासी डॉक्टरांना दिले जाणारे त्यांचे हक्काचे विद्यावेतन हे त्यांना कधीही वेळेवर देण्यात आलेले नाही. अनेक महिन्यांसाठी विद्यावेतन थकीत असल्यामुळे, निवासी डॉक्टरांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा प्रमाणात हॉस्टेल्स उपलब्ध नाही. त्यामुळे दोन-तीन डॉक्टरांना एकच खोलीत अत्यंत अडचणीत राहावे लागत असल्याचे म्हटले आहे.

COMMENTS