श्रीरामपूर ः भारतीय संस्कृती आणि ज्ञानमूल्यांची जीवनभर जोपासणा करणारे श्री सुरेश गड्डे गुरुजींनी ’गुरुजी’ या शब्दाची सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक

श्रीरामपूर ः भारतीय संस्कृती आणि ज्ञानमूल्यांची जीवनभर जोपासणा करणारे श्री सुरेश गड्डे गुरुजींनी ’गुरुजी’ या शब्दाची सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सेवेची प्रतिष्ठा निर्माण केली असल्याचे प्रतिपादन विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी केले.
श्रीरामपूर रेल्वे उड्डाणपुलाजवळील माऊली वृद्धाश्रामात सुरेश गड्डे गुरुजींचा सन्मान करताना ते बोलत होते. वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी श्री गड्डे गुरुजींचे मोठेपण व्यक्त करून सत्कार केला. विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे सुखदेव सुकळे, अॅड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके, सेवानिवृत्त शिक्षक किसनराव निकम, तुंगार गुरुजी, गोरक्षनाथ अकोलकर आदिंनी गड्डे गुरुजींचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या. सुखदेव सुकळे यांनी पुढे सांगितले की, गडुगुरुजींनी गेल्या एक्याऐंशी वर्षात जी सेवासंस्कृती जोपासली तो आदर्श असल्याचे सांगितले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी आभार मानले.

COMMENTS