Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परिस्थिती बिघडू नये म्हणून आरक्षण बचाव यात्रा

वंचितचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन

पाथर्डी ः राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्यावरून दोन गट पडले असून या विषयावर राजकीय वाद निर्माण झाला असता तर आपण समजू शकतो मात्र आता हा वाद सामाजिक

तरुणीचा पत्ता न सांगितल्याने तिघांकडून एकास बेदम मारहाण
दुधाला 40 रुपये दराच्या मागणीसाठी अकोलेत निदर्शने  
अहमदनगर-पुणे मार्गावर धावली राज्यातील पह‍िली ‘ई-बस’

पाथर्डी ः राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्यावरून दोन गट पडले असून या विषयावर राजकीय वाद निर्माण झाला असता तर आपण समजू शकतो मात्र आता हा वाद सामाजिक पातळीवर पोहचला ही बाब गंभीर असल्याने परिस्थिती बिघडू नये यासाठी आपण राज्यभर यात्रा काढत गावगावात जाऊन परिस्थिती बिघडवू नका असे आवाहन करणार असल्याचे प्रतिपादन वंचितचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. आंबेडकर यांनी काढलेल्या आरक्षण बचाव यात्रेचे येथील नाईक चौकात स्वागत करण्यात आले.या वेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश समन्वयक प्रा. किसन चव्हाण, गोकुळ दौण्ड, अ‍ॅड.अरुण जाधव, रेखा ठाकूर, अविनाश मुशीकर, अविनाश बारस्कर, सविता मुंडे, उद्धव खाडे, किसन आव्हाड  हे उपस्थित होते.              
पुढे बोलताना अ‍ॅड. आंबेडकर यांनी म्हटले की, आरक्षण देणे हा सरकारचा अधिकार आहे तर मतदान करणे हा आपला अधिकार आहे.राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर वेळीच निर्णय घेतला असता तर हा वाद विकोपाला गेला नसता असे मत आरक्षण देणे हा सरकारचा अधिकार आहे तर मतदान करणे हा आपला अधिकार आहे.ते कोणाला द्याचे हे ज्यांनी त्यांनी ठरवावे मात्र लोकशाही मध्ये ज्याला सर्वाधिक मते मिळतात तो निवडून येतो. माजी पंतप्रधान स्व. व्ही पी सिंग यांनी 7 ऑगस्टला मंडळ आयोग लागू करून सर्वाना आरक्षण दिले.

   आपण 25 जुलैपासून जी राज्यात आरक्षण बचाव यात्रा सुरु केली तिचा समारोप येत्या 7 ऑगस्ट ला छत्रपती संभाजी नगर येथे करणार आहोत. या समारोपाच्या कार्यक्रमाला सर्वानी उपस्थित राहावे. या दिवशी आपण मंडळ दिन साजरा करणार असल्याचे शेवटी आंबेडकर म्हणाले तर या वेळी बोलताना प्रा.चव्हाण म्हणाले कि जर आंबेडकर यांना जर राज्याचे मुख्यमंत्री केले तर मराठा समाजाला आरक्षण नक्की मिळेल कारण आंबेडकर हेच या वरचा रामबाण उपाय आहेत तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असून कायद्याचा त्यांचा दांडगा अभ्यास असल्याने ते या विषयावर मार्ग काढू शकतात.आंबेडकर यांनी आज मढी व भगवानगडाला सुद्धा भेट दिली.

COMMENTS