सांगली/प्रतिनिधी ः कोणीतरी घोषणा करून आरक्षण मिळणार नाही. कायदेशीर मार्गाने आरक्षण द्यावे लागेल, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना ट
सांगली/प्रतिनिधी ः कोणीतरी घोषणा करून आरक्षण मिळणार नाही. कायदेशीर मार्गाने आरक्षण द्यावे लागेल, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी अभ्यास गट स्थापन करून योग्य तो आकडा ठरवला पाहिजे,असे मत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
शिवशक्ती परिक्रमाच्या निमित्ताने सांगलीमध्ये पंकजा मुंडे यांचे मोठ्या जल्लोषात भाजपच्या वतीने स्वागत करण्यात आले. सांगलीचे आराध्यदैवत गणपतीचे पंकजा मुंडे यांनी दर्शन घेतले. राज्य सरकारने या प्रकरणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत कुणबी दस्तावेज दाखवणार्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. तसा जीआर ही काढला. पण त्यात वंशावळ दाखवण्याची अट ठेवली. त्यावर मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणार्या मनोज जरांगे पाटील यांनी हरकत घेऊन सरकारचे टेन्शन वाढवले. वंशावळी हा शब्द काढा मगच उपोषण मागे घेतो, सरसकट आरक्षण द्या, असे सांगत मनोज जरांगे यांनी निर्णयात सुधारणा करण्याचे सरकारला सुचवले आहे. माजी मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस नेत्या पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रोत चोरट्याने हात सफाई करत तब्बल 15 तोळ्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे भाजपच्या डॉक्टर सेलच्या शहराध्यक्षासह एका पत्रकार आणि एका कार्यकर्त्यांला पंकजा मुंडेंची परिक्रमा यात्रा चांगलीच महागात पडली आहे. पंकजा मुंडे यांची राज्यात शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरू आहे. त्यांची परिक्रमा यात्रा फलटणमध्ये दाखल झाल्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील चौकात भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. पंकजा मुंडे यांचा ताफा थांबताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी गाडीभोवती गर्दी केली.
COMMENTS