Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरक्षण वर्गीकरणामुळे मातंग समाजाची उन्नती व प्रगती होईल-सचिन भाऊ साठे

तलवाडा प्रतिनिधी-अनुसुचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण व आर्टीच्या निर्मीतीसाठी सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य आयोजित मराठवाडा विभागीय बैठकीचे आयोजन

अतिक्रमण कुणाचे आहे ?
पंकजा मुंडेच्या ’शिवशक्ती’ यात्रेला सुरुवात
हजरत खाँजा शमशोद्दीन गाझी दर्गा उरसात वळू उधळल्याणे धावपळ 

तलवाडा प्रतिनिधी-अनुसुचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण व आर्टीच्या निर्मीतीसाठी सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य आयोजित मराठवाडा विभागीय बैठकीचे आयोजन साई पॅलेस गेवराई येथे करण्यात आले होते
या बैठकीला संबोधित करताना मानवहित लोकशाही पक्षाचे सर्वेसर्वा सचिन भाऊ साठे म्हणाले कि अनुसूचित जाती आरक्षणाचा लढा इथल्या शासन व्यवस्थेला हादरा देणारा लढा आहे आता मातंग समाजाने आरक्षण वर्गीकरण आणी आर्टी स्थापनेचा लढा एक एकट्याने न लढता सकल मातंग समाजाच्या नावाखाली मातंग समाजाने एकजुट होवुन लढावा
सरकार व्हि.चिन्नया केसचा मुद्दा पुढे करून आरक्षण वर्गीकरणाचा लढा दाबण्याचा प्रयत्न करत आहे यासाठी मातंग समाजाने आता आरक्षण वर्गीकरणाचा लढा अधिक तीव्र करावा लागेल
या आरक्षण वर्गीकरणामुळेच मातंग समाजाची उन्नती व प्रगती होईल असे मत सचिन भाऊ साठे यांनी मांडले
यावेळी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले डॉ.संजय गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सचिन भाऊ साठे भास्कर शिंदे गणपत भिसे टि.एन.कांबळे सुशिला ताई लोमटे रमेश गालफाडे मारोती वाडेकर डॉ गोतावळे वैरागड सर तोंडे सर कमलेश क्षिरसागर राजेश उफाडे गजानन वैरागड हे होते
यावेळी या बैठकीस उपस्थित दादाराव रोकडे हनुमान नाना क्षिरसागर अर्जून सुतार अशोक कांबळे विशाल कांबळे दिलिप हातागळे संतोष सुतार बाबासाहेब कांबळे यांच्या सह मराठवाड्यातुन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
या कार्यक्रमाचे आयोजन सुदाम धुपे सर व खाजेकर सर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड सुनील सुतार यांनी केले तर आभार वैरागड सर यांनी मानले

COMMENTS