Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कत्तलीसाठी आणलेल्या सहा गोवंश जनावरांची सुटका

कोपरगाव तालुका ः कोपरगाव शहारात कत्तलीसाठी आणलेल्या सहा गोवंश जनावरांची पोलिसांनी गोरक्षकांच्या सहकार्याने सुखरूप सुटका केली असून पोलिसांनी केलेल

विद्यार्थ्यांना त्रास देणार्‍या ग्रंथपाल पुरे यांची बदली करा
नगर अर्बन प्रकरणातील डॉक्टरांचे जामीन फेटाळले
शहाजापूर येथे टाळ मृदुंगाच्या गजरात गणपती विसर्जन

कोपरगाव तालुका ः कोपरगाव शहारात कत्तलीसाठी आणलेल्या सहा गोवंश जनावरांची पोलिसांनी गोरक्षकांच्या सहकार्याने सुखरूप सुटका केली असून पोलिसांनी केलेल्या कारवाईत साठ हजार रुपये किंमतीचे 500 किलो गोमांस मिळून आले आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी शकील लकिरा बागवान रा सुभाषनगर ता कोपरगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव शहरातील आयशानगर परिसरात खंदकनाल्याच्या कडेला काटवनात व पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जनावरांची कत्तल करण्यात येत असून  कत्तलीच्या उद्देशाने गोवंश जनावरे बांधून ठेवल्याची माहिती शहर पोलिसांना मिळताच शहर पोलिसांनी 17 जून  रोजी पावने बारा वाजेच्या सुमारास धडक कारवाई करत सहा गोवंश जनावरांसह, 25 हजार रुपये किमतीचा एक कापलेल्या अवस्थेत असलेला बैल तसेच साठ हजार रुपये किंमतीचे 500 किलो गोमांस, धारदार हत्यार असा एक लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल  पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी शकील लकिरा बागवान राहणार सुभाषनगर तालुका कोपरगाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करीत आहे.

COMMENTS