Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंजनेरी गडावरील 10 पर्यटकांची सुटका

नाशिक ः कोकणात मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. तसेच मुुंबईसह पुण्यात पावसाचा जोर असतांना, पर्यटन स्थळांवर देखील मोठी गर्दी होत आहे. मात्र या पर

बिल्कीस बानो प्रकरणातून न्या. बेला त्रिवेदींची माघार
या शाळेत शिक्षकच पुरवतात विद्यार्थ्यांना कॉपी l LOKNews24
एकनाथ दामू येळवंडे यांचे निधन

नाशिक ः कोकणात मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. तसेच मुुंबईसह पुण्यात पावसाचा जोर असतांना, पर्यटन स्थळांवर देखील मोठी गर्दी होत आहे. मात्र या पर्यटनस्थळांवर अनेक दुर्घटना समोर येत आहेत. नाशिकमधून देखील असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंजनेरी गडावर रविवारी दहा पर्यटक अडकून पडले होते. मात्र आता अखेर त्यांची सुटका करण्यात आली आहे. नाशिकच्या अंजनेरी गडावर अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने 10 पर्यटक अडकल्याची घटना घडली होती. रविवारी सुट्टीच्या दिवशी हे पर्यटक अंजनेरी गडावर फिरायला आले होते. मात्र दुपारच्या सुमारास पावसाचा जोर वाढल्याने हे सर्व पर्यटक अडकून पडले होते. मात्र या अडकलेल्या पर्यटकांची वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी सुटका केली.

COMMENTS