Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरिया रिपब्लिकची अंतिम फेरीत धडक

पुणे / प्रतिनिधी : कोरिया रिपब्लिकने एएफसी वुमन्स आशिया कप भारत 2022 स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारताना फिलिपाईन्सचे कडवे आव्हान 2-0 गोलने परताव

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा राष्ट्रवादी तर्फे जाहीर निषेध
जिवदान देणार्‍या दूताचा हृदय विकाराने मृत्यू; कावडी गावच्या माजी सरपंचाबाबतची हृदयद्रावक घटना
श्री सिध्दनाथ-जोगेश्‍वरी यांचा शाही विवाह सोहळा थाटात

पुणे / प्रतिनिधी : कोरिया रिपब्लिकने एएफसी वुमन्स आशिया कप भारत 2022 स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारताना फिलिपाईन्सचे कडवे आव्हान 2-0 गोलने परतावले. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मैदानावर झालेल्या या उपांत्य फेरीच्या सामन्यात पहिल्याच सत्रात दोन गोल करत कोरिया रिपब्लिकने अंतिम फेरीतील आपले स्थान निश्‍चित केले. विशेष म्हणजे कोरिया रिपब्लिकने पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. चो सो-ह्यून आणि सोन हवा-येओन यांनी प्रत्येकी एक गोल करत संघाचा विजय साकारला.
फिलिपाईन्सचा पराभव झाला असला, तरी त्यांची कामगिरी प्रभावित करणारी ठरली. स्पर्धेच्या इतिहासामध्ये फिलिपाईन्सने पहिल्यांदाच उपांत्य फेरीत स्थान मिळवले होते. या कामगिरीच्या जोरावर त्यांना ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये होणार्‍या फिफा विश्‍वचषक स्पर्धेत पहिल्यांदा सहभागी होण्याची संधी मिळू शकते.
विजयाच्या निधार्रानेच मैदानात उतरलेल्या कोरिया रिपब्लिकने थोडाही वेळ वाया न घालवता फिलिपाईन्सच्या गोलक्षेत्रात आक्रमण केले आणि चौथ्याच मिनिटाला पहिला गोल केला. सामना वीर ठरलेली चो हिने किम ह्ये-रीच्या कॉर्नर किकवर अप्रतिम हेडर मारला आणि चेंडू फिलिपाईन्सची गोलकीपर ऑलिवा मॅकडेनियलला चकवून गोल जाळ्यात गेला. यानंतर पहिल्याच उपांत्य सामन्यात खेळत असलेल्या फिलिपाईन्सच्या खेळाडूंचा उत्साहही दिसून आला. सहा मिनिटांनी सोफिया हॅरिसनने गोल करण्याची संधी निर्माण केली, पण तिला यश आले नाही.
कोरिया रिपब्लिकनेही आक्रमक खेळ कायम राखत सामन्यावरील पकड सोडू दिली नाही. सोन येओनने 15 व्या आणि 19 व्या मिनीटाला फिलिपाईन्सच्या गोल जाळ्यावर आक्रमण केले. परंतू गोलकीपर मॅकडेनियलने अप्रतिम बचाव करत कोरिया रिपब्लिकला गोल करण्यापासून रोखले. फिलिपाईन्सने यानंतर जोरदार प्रत्युत्तर देताना कोरिया रिपब्लिकवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. कतरिना गिलोउने 24 व्या मिनिटाला दूरुन मारलेल्या वेगवान किकवर चेंडू अवघ्या काही इंचने गोल जाळ्याच्या बाहेरुन गेला.
कोरिया रिपब्लिकने यानंतर आपला वेग अधिक वाढवला. 34 व्या मिनिटाला कोरिया रिपब्लिकने अखेर आपली आघाडी दुप्पट केलीच. चो ह्यो-जूच्या क्रॉसवर सोनने चेंडूचा अचूक अंदाज घेत शानदार गोल केला.
दुसर्‍या सत्राच्या सुरुवातीला फिलिपाईन्सचे मुख्य प्रशिक्षक लेन स्टेजसीक यांनी मालीआ ल्युसी सीझर, चँडलर मॅकडेनियल आणि सारा कास्टानेडा यांना मैदानावर उतरवले. मात्र, याचा फारसा परिणाम जाणवला नाही. दुसर्‍या सत्रात कोरिया रिपब्लिकची गोलकीपर किम जुंग-मी हिला क्वचितच आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. त्याचवेळी फिलिपाईन्सने भक्कम बचावाचे प्रदर्शन केल्याने कोरिया रिपब्लिकला तिसरा गोल करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली. पण त्यांना अखेरपर्यंत यश आले नाही. 67 व्या मिनिटाला गोल करण्याची मिळालेली सुवर्ण संधी कोरिया रिपब्लिकच्या सोनला साधता आली नाही. यानंतर कोरिया रिपब्लिकने सातत्याने फिलिपाईन्सच्या गोलपोस्टवर आक्रमण केले, मात्र त्यांना यश आले नाही.

COMMENTS