बायोडिझेल कारवाईचा मागवला अहवाल ; पोलिस अधीक्षक पाटील यांचे कोतवालीला आदेश

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बायोडिझेल कारवाईचा मागवला अहवाल ; पोलिस अधीक्षक पाटील यांचे कोतवालीला आदेश

अहमदनगर/प्रतिनिधी - बायोडिझेलचा बेकायदेशीर साठा व विक्री प्रकरणी कोतवाली पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी मागविली आह

आंबेडकरी तरूणांवरील गुन्हे मागे घ्या
शेतकर्‍यांनी अ‍ॅपच्या माध्यमातून ई-पीक नोंदणी करून घ्यावी
राष्ट्रवादीचा काँग्रेस जामखेड तालुकाध्यक्ष कोण?

अहमदनगर/प्रतिनिधी – बायोडिझेलचा बेकायदेशीर साठा व विक्री प्रकरणी कोतवाली पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी मागविली आहे. बायोडिझेलच्या दोन गुन्ह्यांच्यासंदर्भात अनेकविध चर्चा मध्यंतरी नगर शहर व नगर तालुक्यासह जिल्हाभरात होत्या. बडी राजकीय मंडळीही या प्रकरणाशी संबंधित असल्याचे सांगितले जात होते. या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधीक्षक पाटील यांनी कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांना केलेल्या कारवाईचा अहवाल मागितल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.
नगर शहरासह जिल्ह्यामध्ये बायोडिझेलच्यासंदर्भामध्ये धडक कारवाई मोहीम जिल्हा पुरवठा विभाग व त्यानंतर जिल्हा पोलिस प्रशासनाने मध्यंतरी केली. कोट्यवधी रुपयांचे बायोडिझेल सापडल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यानुसार अनेक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यापैकी काही जणांना न्यायालयाने जामीन दिला तर काहीजणांचे न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर झाले आहेत. नगर तालुक्यातील वाटेफळ येथे सापडलेल्या बायोडिझेल प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात तर केडगाव येथे सापडलेल्या बायोडिझेल प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या पार्श्‍वभूमीवर नगर शहरातील केडगाव उपनगरातील बायोडिझेलच्या संदर्भात केलेल्या कारवाईबाबत कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्याकडून अहवाल मागितला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे. बायोडिझेल हा ज्वलनशील पदार्थ आहे का नाही याबाबतची मतमतांतरे आहेत. तसेच पोलिसांच्या तपासामध्ये काही बाबी या वेगवेगळ्या पद्धतीच्या असल्याचे निदर्शनास आले आहे. कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये मागील आठवड्यामध्ये केडगाव येथे अशा प्रकारची पोलिसांनी कारवाई करून लाखोंचे बायोडिझेल हस्तगत केले होते. या संदर्भामध्ये 22 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणासंदर्भामध्ये अधिक काही माहिती सुद्धा पोलिसांच्या हाती लागली होती, असे बोलले जात होते. त्यानंतर बायोडिझेलच्या संदर्भात अनेक तर्कवितर्क मांडले गेले. वाटेफळ येथील गुन्ह्यात कारवाई करण्यात आलेल्या काहींना नंतर कोतवाली पोलिस ठाण्याच्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले होते. मात्र, यातील काहींना न्यायालयाने जामीन दिला तर काहींचा अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर या प्रकरणाचा पोलिस तपास थंडावला. या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधीक्षक पाटील यांनी केलेल्या कारवाईचा अहवाल मागवल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे. दरम्यान, या संदर्भामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी, बायो डिझेल प्रकरणी कशा पद्धतीने फिर्याद दाखल करण्यात आली व तपास कशा पद्धतीने करण्यात आला याची सविस्तर माहिती कोतवाली पोलिसांनी सादर करावी, असे आदेश दिले आहे.

अहवालातून वस्तुस्थिती समजले
नगर जिल्ह्यामध्ये बायोडिझेलच्या संदर्भामध्ये पुरवठा विभाग व पोलिसांनी कारवाई केली, ही वस्तुस्थिती आहे. काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाले आहे, अशी बाब समोर आल्यामुळे गुन्हे दाखल केले आहे. पण कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आम्ही माहिती मागवली आहे, ती आल्यानंतरच वस्तुस्थिती पुढे येईल, असेही पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

COMMENTS