Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थ्यांना त्रास देणार्‍या ग्रंथपाल पुरे यांची बदली करा

मुख्याधिकार्‍यांकडे मागणी; वाचनालयात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

श्रीरामपूर ः येथील लोकमान्य टिळक वाचनालयाच्या ग्रंथपाल स्वाती पुरे या अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना आरेरावी करतात, वैयक्तीक बाबींवरून बोलतात व मान

‘वंचित’च्या वतीने आयोजित सोलो डान्स स्पर्धा उत्साहात
कॉ. कातोरेंवरील हल्ल्याच्या प्रतिकाराबद्दल माकपच्या कार्यकर्त्यांचे कौतुक : डॉ. अशोक ढवळे
काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड

श्रीरामपूर ः येथील लोकमान्य टिळक वाचनालयाच्या ग्रंथपाल स्वाती पुरे या अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना आरेरावी करतात, वैयक्तीक बाबींवरून बोलतात व मानसिक त्रास देतात, अशी तक्रार करून आज विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले. पुरे यांच्या विरोधातील घोषणांनी वाचनालय परिसर निनादून गेला. अखेर मुख्याधिकार्‍यांना आंदोलकांची भेट घ्यावी लागली. आपले कैफियत मांडून विद्यार्थ्यांनी पुरे यांची बदली करण्याची मागणी केली.

          शुक्रवारी सकाळी विद्यार्थी अभ्यासाला आले असता पुरे यांनी अभ्यासिकेतील खुर्च्यांच्या फळ्या काढून घेतल्याने विद्यार्थी संतप्त झाले. यावेळी विद्यार्थीनी व पुरे यांच्यात बाचाबाची झाली. तयावरून विद्यार्थ्यांनी त्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. जोरदार घोषणाबाजी केली. पुरे या मनमर्जी कारभार करतात.विद्यार्थ्यांना नेहमी आरेरावीची भाषा वापरतात. वाचनालय घेरचे आहे आहे काय? शिस्तीत रहा अशी भाषा वापरतात. शौचालयाला कुलूप लावून ठेवतात. पिण्याचे पाणी अस्वच्छ असते. विद्यार्थीनींनी जीन्स पॅन्ट घालू नये अशी सक्ती करतात, अशा एक ना अनेक तक्रारी यावेळी  तक्रार विद्यार्थ्यांनी केल्या. मुख्याधिकारी येत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भुमिका घेतल्याने अखेर मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी वाचनालयात येऊन विद्यार्थ्यांची भेट घ्यावी लागली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे यांनी शासनाचा पगार घेऊन जनतेला पदाचा मिजास दाखविणार्‍या पुरे यांची तात्काळ बदली करा. अन्यथा पालिकेसमोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला. सामाजिक कार्यकर्ते समित मुथ्था यांनी पुरे यांच्या कारभाराचे वाभाडे मुख्याधिकार्‍यांसमोर काढले. त्या विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक त्रास देतात. विद्यार्थिनींनी कोणते कपडे घालावेत हे सांगण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला. त्यांची तात्काळ बदली करावी, अशी मागणी त्यांनी केली.

मुख्याधिकारी यांनी एकून घेतल्या समस्या – मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या ऐकूण घेत त्यांना शांत केले. खुर्च्यांच्या काढून घेतलेल्या फळ्या पूर्ववत बसविण्याचे, शौचालयास कूलूप न लावण्याचे तसेच विद्यार्थ्यांशी अरेरावी न करण्याचे आदेश त्यांनी पुरे यांना दिले. शिवाय विद्यार्थ्यांनीही अभ्यास करावा, वाचनालयात राजकारण न आणता विद्यार्थ्यांप्रमाणे वागावे असा सल्लाही त्यांनी दिला. गौरी कुलथे, महेश तारगे, अशोक गांगुर्डे, अभिषेक अग्रवाल, सोमा कासार आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. महिनाभरापूर्वी पालिका प्रशासनाने अभ्यसिका शुल्कात अचानक 10 पट वाढ केली. शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासास पुरे यांनी मज्जाव केला होता. त्यावेळीदेखील पुरे यांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते.

COMMENTS