Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुप्रसिद्ध निवेदक अमीन सयानी यांचे निधन

मुंबई प्रतिनिधी - रेडियो किंग’ अशी ओळख असणारे दिग्गज रेडिओ प्रेझेंटर अमीन सयानी यांचे निधन झाले आहे. 91 व्या वर्षी अमीन सयानी यांनी अखेरचा श्वा

मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याच्या फोनमुळे पोलिसांची धावपळ
बजरंग दल व दुर्गावाहिनीकडून गणरायाचे निर्विघ्न विसर्जन
राजगुरूनगर पंचायत समितीमध्ये अविश्‍वास ठराव मंजूर

मुंबई प्रतिनिधी – रेडियो किंग’ अशी ओळख असणारे दिग्गज रेडिओ प्रेझेंटर अमीन सयानी यांचे निधन झाले आहे. 91 व्या वर्षी अमीन सयानी यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाची बातमी त्यांचा मुलगा रजिल सयानी यांनी कंफर्म केली आहे. अमीन सयानी यांना आजही लोक विसरलेले नाही. रेडियोवर जे लोक ‘बिनाका गीतमाला’ ऐकायचे त्यात असलेली अमीन सयानी यांची एनर्जी आणि त्यांचा मेलोडियस अंदाज आजही सगळ्यांच्या लक्षात असेल. तर त्यांच्या निधनानं कला क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. अमीन सयानी यांचा मुलगा रजिल सयानीनं त्यांच्या निधनाच्या बातमीला कंफर्म केलं. त्यांनी सांगितलं की अमीन सयानी यांना काल हार्ट अटॅक आला. ज्यानंतर लगेच त्यांना एचएन रिलायंस हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले. मात्र, रस्त्यातच त्यांनी प्राण सोडले. अमीन सयानी यांच्या पार्थीवावर उद्या म्हणजेच 22 फेब्रुवारी रोजी अंत्यसंस्कार होणार आहे. त्यासाठी कुटुंबातील काहीच लोक उपस्थित राहतील. दरम्यान, त्यांच्या अखेरच्या दर्शनाविषयी ऑफिशियल स्टेटमेंट लवकरच जारी करण्यात येईल. 

COMMENTS