Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवा

काँगे्रस नेते आशिष देशमुख यांची पक्षाध्यक्ष खर्गेकडे मागणी

नागपूर/प्रतिनिधी ः नाशिक पदवीधर निवडणुकीच्या वादळापूर्वी काँगे्रसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे समोर येत आहे. काँगे्रस नेते डॉ. सुधीर तांबे यांनी

काँग्रेसच्या 10 आमदारांना कारणे दाखवा नोटीस
मी मुख्यमंत्री व्हावे ही कार्यकर्त्यांची इच्छा
कोरडवाहूला एकरी 25 तर बागायतीला 50 हजारांची मदत द्या

नागपूर/प्रतिनिधी ः नाशिक पदवीधर निवडणुकीच्या वादळापूर्वी काँगे्रसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे समोर येत आहे. काँगे्रस नेते डॉ. सुधीर तांबे यांनी नाशिक पदवीधर निवडणुकीत अर्ज न भरता माघार घेतली. त्यानंतर त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. यावरुन काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला होता. मात्र नाना पटोले यांच्या कार्यशैलीवर काँगे्रसचे नेते आशिष देशमुख यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत, त्यांना पदावरून हटवण्याची मागणी थेट पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे केली आहे.

देशमुख यांनी खर्गेंना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, नाना पटोले यांची जी कार्यशैली आहे त्यामुळे यापूर्वी विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता तो आता काँग्रेसच्या हातातून निसटत चालला आहे. आत्ताचीच निवडणूक नव्हे तर यापूर्वीच्या निवडणुकींचा दाखला देताना पक्षातील बेबंदशाही थांबली पाहिजे अशी मागणीच त्यांनी केली आहे. जर ही बेबंदशाही थांबली नाही तर शिंदे गटाच्याही मागे पडून काँग्रेस पाचव्या क्रमांकावर ढकलला जाईल, असेही देशमुख यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. ज्यातील विधानपरिषदेच्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. पण तांबे यांनी आपला मुलगा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्यासाठी आयत्यावेळी पक्षश्रेष्ठींशी कुठलीही चर्चा न करता उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. याप्रकारामुळं काँग्रेसची नाचक्की झाली होती, कारण पक्षात शिस्तीचा अभाव असल्याचे यावरुन दिसून आले होते.

पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून पक्षाची वाताहत – नाना पटोले काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून पक्षाची घसरण सुरूच असून, सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीने काँग्रेसची नामुष्की झाली. यात प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले हेच जबाबदार आहेत. पटोलेंच्या कार्यकाळात पक्षाला सातत्याने नाचक्कीचा सामना करावा लागत आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काँग्रेस पुढच्या काळात महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष ठरेल यासाठी आम्ही कामकाज करू, असे त्यांनी ठासून सांगितले होते. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून काँग्रेसची वाताहत सुरु झाली आहे. डिसेंबर 2021 मध्ये विधान परिषदेसाठी नागपूरच्या जागेवरून काँग्रेस उमेदवार रवींद्र भोयर होते. पण मतदानाच्या काही तास आधी नाट्यमय घडामोडी झाल्या, अचानक अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपच्या बावनकुळे यांचा जबरदस्त विजय झाल्याचे काँगे्रस नेते आशिष देशमुख यांनी पक्षाध्यक्ष खर्गे यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

COMMENTS