Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणतांबा-कोपरगाव रस्त्यावरील बाभळींची झाडे काढण्यास सुरूवात

पुणतांबा ः अपघातास कारणीभूत ठरणार्‍या पुणतांबा-कोपरगाव रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या वेड्या बाभळींची झाडे काढण्यास अखेर सा बा विभागाने गुरुवारी सुरुवात

मधुरा पिचड एमबीबीएस परीक्षेत उत्तीर्ण
प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
माहिती अधिकाराच्या 13 हजार याचिका प्रलंबित

पुणतांबा ः अपघातास कारणीभूत ठरणार्‍या पुणतांबा-कोपरगाव रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या वेड्या बाभळींची झाडे काढण्यास अखेर सा बा विभागाने गुरुवारी सुरुवात केली आहे. कोपरगाव व शिर्डी या दोन्ही रस्त्याचे डांबरीकरणचे काम नुकतेच पूर्ण झालेले असल्याने ग्राम असतात समाधान व्यक्त केले जात असतानाच या दोन्ही रस्त्यावरील अतिक्रमण केलेल्या वेड्या बाभळींची झाडांमुळे अपघात होत होते. महिन्यापूर्वी या बाभळींमुळे येथील एका तरुणाला आपले प्राण गमवावे लागले बाभळी तातडीने काढाव्यात यासाठी अनेकदा मागणी करूनही सा बा विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने प्रथम लोकनियुक्त सरपंच डॉ धनंजय धनवटे व माजी उपसरपंच महेश चव्हाण यांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता मात्र आचारसंहितेचे कारण दिल्याने आठ दिवस रास्ता रोको स्थगित करण्यात आला होता.  गुरुवारी कोपरगाव रस्त्यावरील बाभळीची झाडे काढण्यास सुरुवात झाली असून या रस्त्यावरील सर्व बाभळी काढून रस्ता मोकळा करण्यात येणार असल्याचे सा बा विभागाकडून सांगण्यात आले यामुळे ग्रामस्थात समाधान व्यक्त केले जात आहे

COMMENTS