बाबूजींचे पुण्यस्मरण हे त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता होय : जगन्नाथ महाराज शास्त्री

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाबूजींचे पुण्यस्मरण हे त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता होय : जगन्नाथ महाराज शास्त्री

अभिजित खंडागळे/पाथर्डी : समाज सज्ञान व्हावा, त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचा प्रकाश पडावा यासाठी जगात वेळोवेळी महापुरुषांनी जन्म घेतला त्यापैकी एक थोर स

आईला सांभाळायचे कुणी…भावाचा भावावर कोयत्याने वार
मोबाईलपेक्षा मैदानी खेळांना महत्व द्यावे
मतदान न करणार्‍या शिक्षक मतदारांवर कारवाई होणार का ?

अभिजित खंडागळे/पाथर्डी : समाज सज्ञान व्हावा, त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचा प्रकाश पडावा यासाठी जगात वेळोवेळी महापुरुषांनी जन्म घेतला त्यापैकी एक थोर स्वातंत्र्यसेनानी स्व. बाबुजी आव्हाड.बाबुजींचा समाजाप्रती उद्देश हा प्रांजळ होता.त्यामुळे बाबुजींनी केलेल्या निस्वार्थी  कार्याचा लाभ आजच्या पाथर्डी तालुक्यातील होत आहे.म्हणूनच बाबूजींचे पुण्यस्मरण हे त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता ठरते.असे प्रतिपादन श्री क्षेत्र जगदंबा गड कारेगाव चे मठाधिपती जगन्नाथ महाराज शास्त्री यांनी केले.           

आव्हाड महाविद्यालयात थोर स्वातंत्र्यसेनानी, मा.आ.बाबुजी आव्हाड यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड तर व्यासपीठावर उपाध्यक्ष अड.सुरेश आव्हाड,माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके,सुनील साखरे,बबन सबलस,दत्ताशेठ सोनटक्के,महावीर मुनोत,संदीप आव्हाड,प्राचार्य डॉ.जी.पी.ढाकणे, विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद मेढे,सुरेश कोलते आदी जण उपस्थित होते.  जगन्नाथ महाराज पुढे बोलताना म्हटले की, बाबुजींनी घालून दिलेल्या आदर्शवत मार्गावर आज पार्थ विद्या प्रसारक मंडळाची वाटचाल सुरु असून संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड यांनी आजच्या शैक्षणिक व्यवस्थेला डिजीटल संकल्पनेची जोड दिली आहे.विद्यार्थ्यांना स्वतच्या पायावर उभे राहण्यासाठी कौशल्याधारित अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत भरती होण्यासाठी ग्रंथालय,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तसेच स्पोर्ट अकॅडमिच्या माध्यमातून ते सदैव प्रयत्नशील आहेत.  यावेळी जेष्ठ साहित्यिक अड अनंत खेळकर यांनी बाबूजींवर तयार केलेल्या कवितेचे वाचन डॉ.अशोक कानडे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जी.पी.ढाकणे,सुत्रसंचालन डॉ.अभिमन्यू ढोरमारे तर आभार प्रा.शेखर ससाणे यांनी मानले.Attachments area

COMMENTS