Homeताज्या बातम्यासंपादकीय

वल्गनाकार आठवले ! 

 वल्गना करणं आणि केंद्रीय मंत्री तथा रिपब्लिकन गटाचे नेते रामदास आठवले यांचा विशेष गुणधर्म दिसतो. डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दि

समृध्दीवरची गावे समृद्ध होवोत ! 
पाळीव श्वान आणि बंदी! 
महाराष्ट्र बनले निवडणूकीचे रणमैदान 

 वल्गना करणं आणि केंद्रीय मंत्री तथा रिपब्लिकन गटाचे नेते रामदास आठवले यांचा विशेष गुणधर्म दिसतो. डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आणि उध्दव ठाकरे यांची भेट झाल्यानंतर आठवले यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया आत्मप्रौढी मिरवणारी आणि वल्गना करणारी आहे. त्यांच्या मते भीमशक्ती त्यांच्या पाठीशी आहे.‌ ऍड. प्रकाश आंबेडकर हे वंचित असल्याची टिकाही त्यांनी केली आहे. ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय वाटाघाटींवर देखील त्यांनी भाष्य केले आहे. रामदास आठवले हे केंद्रीय मंत्री झाल्यापासून त्यांचा एकूणच समाजातला दबदबा संपुष्टात आला आहे. कारण ते सत्तेचे सोपान चढून केंद्रीय मंत्री झाले असले, तरी वैचारिक मतभेदांच्यामुळे त्यांच्या मागे असलेला समाज निश्चितपणे तुटला आहे. त्यामुळे संघटनात्मक पातळीवर भीमशक्ती आठवले यांच्याबरोबर नाही. मात्र, भारतीय जनता पक्षाने केंद्र सरकारमध्ये आठवले यांना मंत्री केल्यानंतर आठवलेंचा समज असा झाला की, त्यांच्यामागे संघटन असल्यामुळे त्यांना त्या पदावर घेण्यात आले; परंतु वस्तुस्थिती अशी नाही. भाजप असो किंवा काँग्रेस या कोणत्याही पक्षात, नेता जितका शक्तीहीन असेल, सत्तेच्या पातळीवर तेवढे त्याचे पद वरचे असते. कारण, संघटन बळ असणाऱ्या नेत्यांकडून केव्हाही आव्हान मिळू शकते. त्यामुळे राजकीय पक्ष संघटन बळ नसणाऱ्या नेत्यालाच वरच्या पदावर नियुक्त करीत असतात, ही वस्तुस्थिती दीर्घकाळ सत्तेवर राहणाऱ्या आठवले यांना माहीत नसेल, असे म्हणता येत नाही. आठवले हे पॅंथर नेते असतानाच त्यांची शक्ती होती. परंतु, राज्याच्या राजकारणात शरद पवार यांच्या माध्यमातून त्यांनी सुरुवातीला काँग्रेस आघाडी आणि आता भाजप आघाडीत सामील होऊन स्वतःची संघटनात्मक ताकद उध्वस्त करून टाकली आहे. त्यामुळे केवळ आंबेडकर चळवळीचे प्यादे आपल्या सोबत सत्तेत असले तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली सेक्युलर प्रतिमा निर्माण करण्यात अडचण येत नाही हे भाजपा आणि काॅंग्रेस या दोन्ही पक्षांना चांगलेच ठाऊक आहे. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी काही का असेना प्रत्येक निवडणुकीत आपली प्रयोगशीलता जपली आहे. केवळ, रिपब्लिकन म्हणून आपण सत्तेत येऊ शकत नसलो तर बहुजन समाजाला सोबत घेऊन आपण राजकीय सत्तेत येण्याचे प्रयोग करायला हवे, ही बाब ऍड. प्रकाश आंबेडकर हे चांगल्या प्रकारे जाणतात, म्हणूनच त्यांनी रिपब्लिकन चळवळी बरोबर बहुजन महासंघ, रीडालोस, वंचित आघाडी अशा वेगवेगळ्या प्रयोगांना आकार दिला. अगदी सुरुवातीलाच त्यांनी किनवट चा प्रयोग देखील यशस्वी केला होता. किनवट येथे भीमराव केराम यांना त्यांनी लोकांच्या पैशावर आणि लोकांच्या मतांवरच निवडून आणले होते. मात्र, त्यानंतर काही महिन्यातच ते शरद पवार यांच्याकडे जाऊन बसल्यामुळे ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांना तो राजकीय धक्का होता आणि म्हणून नंतरच्या काळात ते सातत्याने म्हणत राहिले, ” आम्ही निवडून आणू शकतो, परंतु टिकवू शकत नाही!” कारण, आम्ही निवडून आणलेल्या लोकांना सत्ताधारी लोकं प्रलोभने देऊन विकत घेतात. अर्थात, मतांच्या राजकारणात कोणत्याही मोठ्या राष्ट्रीय पक्षाला ऍड. प्रकाश आंबेडकर हुकमी एक्क वाटतात. त्यामुळेच २०१९ च्या निवडणुकीत काॅंग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते त्यांच्या घरी चकरा मारित होते. आठवले यांनी ऍड. प्रकाश आंबेडकर यांची ही ताकद लक्षात घ्यावी.

COMMENTS