Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धर्मकार्य आणि साहित्यसेवा माणुसकीला बळ देईल ः प्रा. आदिनाथ जोशी

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः ब्रह्मलीन परमपूज्य रेवणनाथ महाराज यांच्या रेणुका माता मंदिर सेवाधर्माचा आदर्श आणि लेखन वाचन संस्कृतीपूर्वक साहित्यसेवा यां

जायनावाडी बिताका गावात राबवली स्वच्छता मोहीम
सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन
प्रा. राम शिंदे यांच्यावर बोलण्या अगोदर दहा वेळा आरसा पहावा

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः ब्रह्मलीन परमपूज्य रेवणनाथ महाराज यांच्या रेणुका माता मंदिर सेवाधर्माचा आदर्श आणि लेखन वाचन संस्कृतीपूर्वक साहित्यसेवा यांची  जपवणूक महत्वाची आहे. निर्मळ धर्मकार्य आणि साहित्यसेवा हेच माणुसकीला बळ देणारे आहे, असे मत श्रीरेणुका माता मंदिराचे प्रमुख ह.भ.प.अ‍ॅड. प्रा. आदिनाथ जोशी यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर नेवासा रोडवरील वडाळा महादेव येथील श्रीरेणुका माता आश्रम येथे दर्शन आणि साहित्यचिंतन बैठकीत ते बोलत होते.यावेळी माजी प्राचार्य टी. ई. शेळके, अशोक बंकेंचे व्यवस्थापक गणेशराव कुलकर्णी, प्राचार्य डॉ. शन्करराव गागरे, साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये,विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे,श्रीमती नलिनी जोशीमाता, आदिती जोशीताई, रजनीताई कुलकर्णी, श्रीमती शैलजाताई सातभाई,  चि. आर्यन जोशी आदी उपस्थित होते. ब्रह्मलीन रेवणनाथ जोशी महाराज यांचे प्रतिमेचे ग्रन्थ वाहून संतपूजन करण्यात आले.प्रास्ताविक करताना डॉ. उपाध्ये यांनी उपस्थितींना पुस्तके भेट देऊन त्याचे महत्व सांगून ब्रह्मलीन प.पू. रेवणनाथ महाराज यांचा चरित्रग्रन्थ आणि भक्त आठवणी संग्रह प्रकाशित झाल्यास सर्वांना लेखन दिशावर्धक ठरेल असे सांगितले. प्रा. आदिनाथ जोशी यांनी असा चरित्र साहित्य लेखनाचा संकल्प असून बाबांचे सुंदर, दर्शनीय स्मृतीस्थळ उभारणार असल्याचे सांगून सर्वसमावेशक कार्य करणार आहे असे सांगून बाबांच्या आठवणी कथन केल्या. प्राचार्य डॉ. गागरे यांनी परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले व ब्रह्मलीन रेवणनाथ महाराजांच्या आठवणी सांगितल्या. प्राचार्य शेळके, सुखदेव सुकळे, अशोक बँकेचे व्यवस्थापक गणेशराव कुलकर्णी यांनीही मंदिर परिसरांच्या आठवणी सांगितल्या. आदिती जोशीताई यांनी नियोजन केले. प्रा.डॉ.उपाध्ये यांनी आभार मानले.

COMMENTS