Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरच्या स्वामी समर्थ मठात उद्यापासून धार्मिक उपक्रम

अहमदनगर/प्रतिनिधी ः मध्य नगर शहरातील गुजरगल्ली येथील श्री स्वामी समर्थ मठ (रेखी मठ) येथे उद्या रविवारी दि. 19 मार्च ते 23 मार्च 2023 या दरम्यान श

नवोदय विद्यालयात आढळले आणखी 12 कोरोना बाधीत
ओबीसी फॅक्टर पुस्तक समाजाला दिशादर्शक ठरेल
कोरोना योद्धे आजच्या युगातील मनुष्य रूपातील देव : कारभारी आगवन

अहमदनगर/प्रतिनिधी ः मध्य नगर शहरातील गुजरगल्ली येथील श्री स्वामी समर्थ मठ (रेखी मठ) येथे उद्या रविवारी दि. 19 मार्च ते 23 मार्च 2023 या दरम्यान श्री स्वामी समर्थ जन्मोत्सव (जयंती) साजरा केला जाणार आहे. सर्व स्वामीभक्तांनी या उत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले केले आहे.

19 ते 22 मार्च दररोज सकाळी 7 ते 8 मंगल वाद्ये गजर व 8 ते 10 पवमानसुक्त अभिषेक, सायंकाळी 5 ते 7 हभप महेशमहाराज कस्तुरे यांचे संतचरित्र व स्वामीचरित्रावर नारदीय कीर्तन होईल. गुरुवार, 23 मार्च रोजी सकाळी 6 ते 8 जन्मोत्सवाचे कीर्तन, सायंकाळी 5 ते 7 श्रींची मिरवणूक व त्यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाईल. सोमवारी दि. 20 मार्च सायंकाळी 4 ते 5 प्रा. मकरंद खरवंडीकर व पंडित धनश्री खरवंडीकर यांच्या भजनसंध्येचा व बुधवारी दि. 22 मार्च रोजी सायंकाळी 7 ते 9 ओंकार देऊळगांवकर यांचे गायन होईल. स्वामी भक्तांनी उत्सवातील विविध धार्मिक कार्यक्रमांत सहभागासाठी दयानंद रेखी (मो. 9420797526), अजित रेखी (मो. 9822999628) व योगेश रेखी (मो. 9403026270) यांच्याशी संपर्क साधावा.

COMMENTS