Homeताज्या बातम्यासंपादकीय

धिक्कारार्ह काश्मीर हल्ल्यात धर्माचा संबंध नाही !

काश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला, याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे! देशभरातील अनेक राज्यांमधून पर्यटनासाठी आलेल्या पर्यट

कर्मवीर काळे विद्यालयाचा दहावीचा निकाल 95.6 टक्के
Pune : मॅनेजरसमोर गल्ल्यात हात घालून चोरट्यांनी पैसे लांबवले | LOKNews24
बिग बॉस 16 मध्ये दिसणार हर्षद

काश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला, याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे! देशभरातील अनेक राज्यांमधून पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर, दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करून जवळपास २८ पर्यटकांचा जीव घेतला. पर्यटकांवर हल्ला करणारा दहशतवादी हल्ला, हा प्रथमच एवढ्या भीषण स्वरूपात घडलेला आहे. पर्यटकांना लक्ष करून अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले, यापूर्वी झाल्याचे ऐकिवात नाही. मात्र, या ठिकाणी सर्वात अधिक पर्यटकांची संख्या फिरण्यासाठी असते; त्याच विभागात त्यांची हाॅटेल्सही मोठ्या प्रमाणात असतात; अशा ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अतिशय मजबूत पद्धतीने असावी! परंतु, प्रत्यक्षदर्शी किंबहुना वेगळ्या वेगळ्या स्त्रोतांमधून बाहेर येत असलेली माहिती, म्हणजे सुरक्षा यंत्रणांची बऱ्यापैकी अनुपस्थिती या विभागात होती. त्याची परिणती दहशतवाद्यांना जवळपास २० मिनिटे बेछूट गोळीबार करण्यासाठी वेळ मिळाला. त्यामध्ये २८ जणांना जीव गमवावा लागला आहे. या दहशतवादी हल्ल्यातून दोन गोष्टी प्रामुख्याने दिसतात; एक म्हणजे काश्मीरमध्ये पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये दहशत पसरवणे आणि दुसरं म्हणजे ज्या काश्मीरच्या जनतेचे उदरनिर्वाहाच साधन, हे एकमेव पर्यटन व्यवसाय असतानाही, त्या पर्यटनाच्या व्यवसायावर घाला घालण्याचा हा एक प्रकार आहे. त्यामुळे या दहशतवादी हल्ल्याची अनेक तऱ्हेची कारणमीमांसा समोर येत असली तरी, प्रामुख्याने काल  दुपारपासून जी एक बाब पसरवली जाते आहे की, पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या झाडल्या; ज्या ठिकाणी या गोळ्या झाडण्यात आल्या ते ठिकाण म्हणजे जवळपास दोन हजार पर्यटकांचे त्यावेळी फिरण्याचे ठिकाण होते. अशा ठिकाणी दहशतवादी हल्लेखोरांना एवढा वेळ कसा मिळाला? हा एक भाग आहे. दुसरा म्हणजे केवळ १५ ते २० मिनिटांत दहशतवाद्यांनी त्यांचं काम उरकलं आहे. त्यामुळे, अशा पद्धतीने विचारणा करून त्यांनी हा हल्ला केला असं म्हणणं तितकस तर्कसंगत वाटत नाही. मात्र, त्यांनी यामध्ये एक लॉजिक मात्र वापरलेले दिसतं की, कोणत्याही महिला पर्यटकाला त्यांनी इजा पोहोचवलेली नाही. शिवाय धर्म विचारून जर हा हल्ला झाला असता तर, या हल्ल्यामध्ये मूळ काश्मीरचे रहिवासी असलेल्या दोन जणांचा बळी गेला असता का? त्यामध्ये त्यांची नावे वेगळ्या प्रकारची येत असली तरी दोन काश्मिरी गृहस्थांना देखील या हल्ल्यामध्ये बळी पळावे लागले आहे. त्यामुळे, जर दहशतवाद्यांनी धर्म विचारून हल्ला केला असता तर काश्मीरचे मूळ रहिवासी त्या हल्ल्यामध्ये ठार झाले नसते, ही बाब ही तेवढीच महत्त्वाची आहे. या घटनेकडे पाहताना कोणत्याही धर्म द्वेषातून पाहता येणार नाही. कारण, अशा प्रकारचा दहशतवादी हल्ला, हा जगाच्या पाठीवर कुठेही घडला तरी तो बेछूटपणे घडत असतो, हे त्यातलं वास्तव आहे. एकंदरीत अतिशय सर्वसामान्य पर्यटकांचा जीव घेऊन दहशतवाद्यांनी जी क्रुरता दाखवली आहे, त्याची योग्य ती शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे. यासाठी देशाच्या यंत्रणांनी कसून प्रयत्न करायला हवे. त्याच पद्धतीने पर्यटकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण जागा असलेल्या या ठिकाणी सुरक्षा यंत्रणांची तितकीच उपस्थिती निर्माण करावी, जितकी यापूर्वी होती. या संदर्भात काही निवृत्त जनरल यांनी अनेक प्रकारचे आरोप लावले असले तरी, आता आरोप-प्रत्यारोप करण्यात अर्थ नाही. परंतु, काश्मीरमध्ये स्थानिक संरक्षणामध्ये जर काही चूक झाली असेल तर, ती चूक शासन यंत्रणेदेखील तात्काळ दुरुस्त करावी. देशाच्या जनतेला आणि काश्मीरच्या जनतेला ही त्यांनी शांततेचे एक आश्वासक वातावरण निर्माण करावं, हीच या निमित्ताने आपल्याला मागणी करता येईल. मात्र, कोणत्याही परिस्थितीत अशा दहशतवादी हल्ले करण्याची पुन्हा कोणत्याही दहशतवादी संघटनेला हिंमत होवू नये, एवढी जरब निर्माण करावी.

COMMENTS