Homeताज्या बातम्यादेश

पूजा खेडकरला अटकेपासून दिलासा

बाजू मांडण्यासाठी दिला सात दिवसांचा अवधी

नवी दिल्ली ः बडतर्फ माजी आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीनावर गुरूवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न

पूजा खेडकरच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी  
अटकेची कारवाई टाळण्यासाठी पूजा खेडकर पळाली
पूजा खेडकरला अटकेपासून दिलासा

नवी दिल्ली ः बडतर्फ माजी आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीनावर गुरूवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने तिला अटकेपासून दिलासा दिला असून तिची बाजू मांडण्यासाठी 7 दिवसांचा अवधी दिला आहे. गुरूवारी झालेल्या सुनावणीत पूजा खेडकरच्या वकिलांनी खोटी साक्ष नोंदविल्याच्या अर्ज प्रकरणात उत्तर दाखल करण्यासाठी कोर्टाकडे एका आठवड्याचा वेळ मागितला होता.
पूजा खेडकरांची चौकशी करणे का गरजेचे आहे, हे सांगताना दिल्ली पोलिस म्हणाले, या प्रकरणी तपास होणे गरजेचे आहे. जसजसा तपास पुढे जाईल तसा तसा मोठा कट उघडकीस येईल, असा दावा दिल्ली पोलिसांच्या वकिलांनी केला आहे. यात महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती आहे. मागील काही महिन्यापासून पूजा खेडकर गायब होत्या, परंतु दिल्ली उच्च न्यायालयात पूजा खेडकर यांच्या वकिलांनी त्या पुण्यातच असल्याचा दावा केला आहे. पूजा खेडकर कुठेही पळून गेल्या नाहीत, त्या सर्व तपासाला सहकार्य करणार असल्याचा सांगत, त्या पुण्यातच असल्याचेही स्पष्ट केले आहे. दिल्ली पोलिसांनी दिव्यांग प्रमाणपत्राबद्दल तपास केला असता अहमदनगर रूग्णालयाने दिव्यांग प्रमाणपत्र दिलेच नसल्याचे समोर आले. त्या संदर्भातचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला होता. दिल्ली पोलिसांनी यापूर्वीच सर्व पुरावे न्यायालयासमोर सादर केले. परंतु आजच्या सुनावणीत पूजा खेडकराच्या वकिलांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी 15 दिवसांचा अवधी मागितला. परंतु दिल्ली उच्च न्यायालयाने अंशत: मागणी मान्य करून 7 दिवसांचा अवधी पूजा खेडकर यांना दिला आहे. पुढील सुनावणी 4 ऑक्टोबरला होणार आहे.

COMMENTS