Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्माला दिलासा

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांचा पाणीसाठा कमी होऊ लागल्याने मुंबईकरांची जलचिंता वाढली आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या सातही धरणांमध्

सुनील तटकरे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष
स्पर्श केल्याने कोरोना व्हायरस पसरत नाही , नवीन संशोधनात आश्चर्यकारक दावा | सुपरफास्ट २४ | LokNews24
शरद पवारांचा पुन्हा यू टर्न

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांचा पाणीसाठा कमी होऊ लागल्याने मुंबईकरांची जलचिंता वाढली आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या सातही धरणांमध्ये मिळून केवळ 27 टक्के पाणी शिल्लक असून जूनअखेपर्यंतच हे पाणी पुरणार आहे. यंदाही पावसाने ओढ दिल्यास नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. दुसरीकडे राज्यात आणि देशातही पाणीसाठा 35 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
मुंबईला उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दररोज 3,900 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होतो. सातही धरणांची एकूण पाणी साठवणक्षमता 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर आहे. रविवारी उर्ध्व वैतरणा धरणात 36.60 टक्के, मोडकसागरमध्ये 24.97 टक्के, तानसामध्ये 41.86 टक्के, मध्य वैतरणामध्ये 12.13 टक्के, भातसामध्ये 26.34 टक्के, विहारमध्ये 39.61 तर तुळशीमध्ये 44.20 टक्के साठयाची नोंद झाली. सातही धरणांमध्ये सरासरी केवळ 27.81 टक्के पाणीसाठा आहे. 7 एप्रिल 2023 रोजी 33.90 टक्के तर 2022 मध्ये 36.76 टक्के पाणीसाठा होता.  भांडुप जलशुद्धीकरण केंद्राच्या परिरक्षण कामांमुळे शहरात 15 टक्के पाणीकपात होत असताना सातत्याने घटत चाललेल्या पाणीसाठयामुळे चिंतेत भर पडली आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील धरणांतील पाणीसाठा 35.88 टक्क्यांवर आला आहे. सर्वात कमी म्हणजे 18.31 टक्के पाणीसाठा औरंगाबाद विभागात आहे. देशातील सरासरी पाणीसाठाही 35 टक्क्यांवर असल्याची माहिती केंद्रीय जल आयोगाने दिली.

COMMENTS